इंग्लंडचा युवा गोलंदाज मैट पार्किंसन ने विराट कोहली आणि एमएस धोनी साठी केले 'अपमानजनक' ट्विट, संतप्त Netizens ने केले ट्रोल

इंग्लंडकडू दोन दिवसांपूर्वी पदार्पण करणाऱ्या लँकशायर फिरकी गोलंदाजाने विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी या दोन दिग्गजांवर भाष्य केले आहे. भारतीय कर्णधार विराट आणि धोनीवर त्याच्या आधीच्या ‘अपमानास्पद’ ट्विटमुळे पार्किन्सन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चर्चेचा विषय ठरला.

मैट पार्किंसन, विराट कोहली आणि एमएस धोनी (Photo Credit: Instagram and IANS)

जागतिक क्रिकेटमध्ये दररोज बरेच खेळाडू आपापल्या देशांकडून पदार्पण करतात. प्रत्येक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडूचे आदर्श ठेवून मोठा होतो आणि काहींना स्वत: साठी प्रेरणा समजून देशासाठी खेळण्याची संधी मिळते. परंतु यातील काही युवा खेळाडू दिग्गजांसमोर आपले स्थान विसरतात आणि टिप्पणी कारण्यापासाठीही त्यांना कमीपणा वाटत नाही. बडबड करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आघाडीवर दिसतात. यापैकी इंग्लंड (England) कडून दोन दिवसांपूर्वी पदार्पण करणाऱ्या लँकशायर फिरकी गोलंदाज मैट पार्किंसन (Matt Parkinson) ने विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) या दोन दिग्गजांवर भाष्य केले आहे. पार्किंसन दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केप टाउनमधील न्यूझीलंडमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात फिरकी गोलंदाज अपयशी ठरला. (Celebrity Brand Value 2019: विराट कोहली याची ब्रँड व्हॅल्यू आहे रोहित शर्मापेक्षा 10 पट जास्त, सलग तिसऱ्यांदा मिळवले अव्वल स्थान)

भारतीय कर्णधार विराट आणि धोनीवर त्याच्या आधीच्या ‘अपमानास्पद’ ट्विटमुळे पार्किन्सन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर कोहली आणि धोनीबद्दल अपमानकारक ट्विट व्हायरल झाल्यावर नेटिझन्सने पार्किन्सनला फाटकारायला सुरुवात केली. त्याने कोहली आणि धोनीबद्दलचे काही ट्वीट डिलीट केले परंतु पार्किन्सनच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट आधीच व्हायरल झाले. सर्वांनी चकित केलेल्या काही कठोर ट्वीटमध्ये पार्किसनने विराटला ‘अहंकारी’ आणि नंतर धोनीला ‘काळीमा’ असे म्हटले. दुसर्‍या ट्विटमध्ये त्याने भारतीय घरगुती सर्किटकडे लक्ष वेधले आणि म्हणाला की, रवींद्र जडेजाने तीन शतक केले आहेत पण तो फलंदाजी करू शकत नाही. "जडेजाने तीन शतकं केली असूनही तो फलंदाजी करू शकत नाही, हे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचे भयंकर प्रमाण दर्शविते," पार्किन्सनमध्ये ट्विट लिहिले.

मॅट पार्कीसनचे ट्विट (Photo Source: Twitter)
मॅट पार्कीसनचे ट्विट (Photo Source: Twitter)

पार्किन्सनच्या कोहली आणि धोनीवरील ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांची एक झलक पाहा:

ट्विट हटवले

माझा पुढचा ब्लॉक

पार्किन्सनने सुमारे 3000 ट्विट हटवले

हे असे का होत आहे?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात पदार्पण करत पार्किन्सन 174 वा वनडे खेळाडू बनला. या सामन्यात पार्किन्सनला एकही विकेट मिळाली नाही. त्याने विराट आणि धोनीबद्दल केलेले ट्विट्स हटवले असले तरी सोशल मीडियावर त्याचे स्क्रीन शॉट्स सध्या व्हायरल होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement