PBKS vs MI Qualifier 2 Live Match Toss Update: 'करो या मरो' सामन्यात पंजाबच्या पदरी नाणेफेक, मुंबई करणार प्रथम फलंदाजी

आजच्या सामन्यात पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. तर जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीसी खेळेल. अशा परिस्थितीत, चाहत्यांना दोन्ही संघांमधील कठीण सामना पाहता येईल. दरम्याण, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

PBKS vs MI Qualifier 2 Live Match Toss Update: 'करो या मरो' सामन्यात पंजाबच्या पदरी नाणेफेक, मुंबई करणार प्रथम फलंदाजी
Punjab vs Mumbai (Photo Credit- X)

Punjab Kings vs Mumbai Indians, TATA Indian Premier League 2025 Qualifier 2:  इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा क्वालिफायर सामना आज म्हणजेच 1 जून रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (PBKS vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा रोमांचक 20 धावांनी पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. त्याच वेळी, पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जच्या संघाला आरसीबीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वेळी, आजच्या सामन्यात पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल. तर जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबीसी खेळेल. अशा परिस्थितीत, चाहत्यांना दोन्ही संघांमधील कठीण सामना पाहता येईल. दरम्याण, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2025 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).