World Cup 2019: या 5 गोलंदाजांनी केली आहे विश्वकप 2019 मध्ये आत्तापर्यंत ची उल्लेखनीय कामगिरी
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक 2019 स्पर्धेत गोलंदाजांने ही प्रभावी खेळी केली आहे. इथे आपण बघू 5 गोलंदाज ज्यांनी ज्यांनी विश्वकप 2019 मध्ये आत्तापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक 2019 स्पर्धेत आपल्याला गेले काही दिवस रोमांचक सामने बघायला मिळत आहे. यजमान इंग्लंड ला नमवून अॅरॉन फिंच (Aaron Finch) च्या ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने विश्वकप च्या सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय जितके फलंदाजांना जाते तितकेच त्यांच्या गोलंदाजांना ही दिले पाहिजे. ऑस्ट्रेलिया च्या विजयात जेसन बेहरनडॉर्फ (Jason Behrendorff) आणि मिशेल स्टार्क (Mitchell Starc) ने महत्वाची भूमिका निभावली. (ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड च्या पराभवानंतर या तीन संघाना होणार सर्वात जास्त फायदा, सेमीफायनलसाठी स्पर्धा वाढली)
दरम्यान, इतर टीमच्या गोलंदाजांने ही प्रभावी खेळी केली आहे. यात बांगलादेश चा शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), भारताचा मोहम्मद शमी (Mohammed Shami), पाकिस्तान चा मोहम्मद अमीर (Mohammad Amir) देखील समाविष्ट आहे. इथे आपण बघू 5 गोलंदाज ज्यांनी ज्यांनी विश्वकप 2019 मध्ये आत्तापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे:
मोहम्मद अमीर 5/30 vs ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी करत अमीर ने 30 धावा देत 5 गडी बाद केले. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीने बाकी गोलंदाजांना फार मदत झाली. एका वेळी वाटत होते की ऑस्ट्रेलिया 350 चा आकडा पार करतील पण अमीर ने योग्य वेळी विकेट्स घेऊन संघाला मोठी मदत केली. पाकिस्तानने जरी 41 धावांनी सामना गमावला तरी अमीरने आपल्या गोलंदाजीची उत्कृष्ट प्रदर्शन केले.
लसिथ मलिंगा 47/4 vs इंग्लंड
क्रिकेट च्या कोणत्याही स्वरूपात छोटा स्कोर डिफेंड करणे सोप्पे नसते. 233 च्या एक लहान स्कोरचा बचाव करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भरपूर विश्वास दर्शविला. लसिथ मलिंगा ने आपल्या अनुभवाचा उपयोग करत इंग्लंड च्या फलंदाजांना माघारी धरण्यास सहाय्य केले. मलिंगाने आपल्या बॉलिंगमध्ये जबरदस्त अचूकता दाखविली. मलिंगाच्या सतत बॉल स्विंग करण्याने फलंदाजांना त्रास झाला.
मिशेल स्टार्क 5/46 vs वेस्ट इंडिज
एकूण 289 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज जोरदार सुरुवात करत 146-3 आघाडी घेतली होती. खेळपट्टी वर शाई होप्स आणि शिमरॉन हेतमायर होते. पॅट कमिन्सने होप्सला बाद करताच विंडीजने आपला मार्ग गमावला. मिशेल स्टार्क या ऑस्ट्रेलिया च्या विजयाचा शिल्पकार ठरला. स्टार्क ने अष्टपैलू आंद्रे रसेल आणि कर्णधार जेसन होल्डर यांना बाद करत संघाच्या विजयात मोठी कामगिरी केली.
ओशिन थॉमस 4/27 vs पाकिस्तान
यंदाच्या विश्वकप मध्ये वेस्ट इंडिज च्या गोलंदाजांनी दृढ दृष्टिकोनाने गोलंदाजी केली. परंतु ओशिन थॉमस ने संपूर्ण गेममध्ये आपली गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. थॉमसने योग्य लाईनवर गोलंदाजी करून गोष्टी स्तिथी संघाच्या बाजूने ठेवलेली. त्याच्या जलद गोलंदाजीने पाकिस्तानी फलंदाजांना मोठे शॉट्स खेळू दिले नाही. थॉमस, निस्संदेह एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे आणि भविष्यात वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये एक स्टार बनण्याची क्षमता त्याच्यात आहे.
शाकिब अल हसन 5/29 vs अफगाणिस्तान
जगातील अव्वल नंबर चा अष्टपैलू शाकिब अल हसन बांगलादेश साठी विश्वकप मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शाकीबने 10 ओव्हरमध्ये 29 रन देऊन 5 विकेट घेतल्या. ही शाकिबच्या करिअर मधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)