IPL Auction 2025 Live

IND-U19 vs IRE-U19 ICC World Cup 2024 Live Streaming: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना, येथे लाइव्ह पाहून घ्या सामन्याचा आनंद

गतविजेत्या टीम इंडियाचा गुरुवारी ब्लूमफॉन्टेन येथील मॅनगॉंग ओव्हल येथे आयर्लंडशी सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

Team India U19 (Photo Credit - X)

IND-U19 vs IRE-U19 ICC World Cup 2024: आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 (ICC U19 World Cup 2024) सुरु झाला आहे. 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक स्पर्धेचा 15 वा मोसम खेळला जात आहे. या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील 5 वेगवेगळ्या ठिकाणी 24 दिवसांत एकूण 41 सामने खेळवले जातील. टीम इंडियाने 5 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. गतविजेत्या टीम इंडियाचा गुरुवारी ब्लूमफॉन्टेन येथील मॅनगॉंग ओव्हल येथे आयर्लंडशी सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

सर्व संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात टीम इंडिया, बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ड गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि नेपाळ आहेत. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test Stats And Record Preview: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम; येथे पाहा आकडेवारी)

 

कधी अन् कुठे पाहणार सामना?

भारतातील 19 वर्षांखालील क्रिकेट विश्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल. भारतीय चाहत्यांना हॉटस्टारवर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहता येणार आहे. यासाठी सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

20 जानेवारी: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश (दुपारी 1:30 वाजता सुरू)

25 जानेवारी: टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड (दुपारी 1:30 वाजता सुरू)

28 जानेवारी: टीम इंडिया विरुद्ध यूएसए (दुपारी 1:30 वाजता सुरू)

अंडर-19 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया: उदय सहारन (कर्णधार), इनेश महाजन (यष्टीरक्षक), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्या कुमार. पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.