RCB vs DC IPL 2025 24th Match Live Streaming: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार लढत, कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना? घ्या जाणून
दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, TATA IPL 2025 24th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 24 वा सामना गुरुवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (DC vs RCB Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या काळात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वरचढ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 11 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला होता.
हे देखील वाचा: TATA IPL Points Table 2025 Update: राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्सने नोंदवला सलग चौथा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
किती वाजता सुरु होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 चा 24 वा सामना गुरुवार, 10 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर RCB विरुद्ध DC आयपीएल 2025 चा 24 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2025 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

