SA vs AUS, ICC WTC Final Day 3 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनलचा तिसरा दिवस, भारतात कुठे पाहणार लाईव्ह थेट प्रेक्षेपण

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मजबूत पकड निर्माण केली. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात 144/8 धावा केल्या आणि या सामन्यात संघाला पुढे नेण्यासाठी एकूण 218 धावांची आघाडी घेतली.

SA vs AUS, ICC WTC Final Day 3 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनलचा तिसरा दिवस, भारतात कुठे पाहणार लाईव्ह थेट प्रेक्षेपण
AUS vs SA (Photo Credit- X)

South Africa vs Australia, ICC WTC Final Day 3 Live Streaming: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 13 जून रोजी दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (SA vs AUS) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जात आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मजबूत पकड निर्माण केली. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात 144/8 धावा केल्या आणि या सामन्यात संघाला पुढे नेण्यासाठी एकूण 218 धावांची आघाडी घेतली.

मात्र, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघ कमकुवत होत असल्याचे दिसून येत होते, दक्षिण आफ्रिका संघ फक्त 138 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने घातक गोलंदाजी करताना 6 बळी घेतले, या विकेटसह कमिन्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 300 बळींचा विक्रम केला आहे. (हे देखील वाचा: Pat Cummins New Record: पॅट कमिन्सने लॉर्ड्सच्या मैदानावर रचला ऐतिहासिक विक्रम, 28 धावा देत घेतल्या 6 विकेट)

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावा केल्या होत्या पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाज लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी 3-3 बळी घेत ऑस्ट्रेलियाला लवकर गुंडाळले. फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने 43 धावांची आणि मार्नस लाबुशेनने 61 धावांची भागीदारी करत डावाची सूत्रे हाती घेतली.

ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही मजबूत स्थितीत दिसत आहे, परंतु दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा अजूनही वरचष्मा आहे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात रोमांचक होण्याची अपेक्षा आहे कारण दक्षिण आफ्रिका कमी धावसंख्येच्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू शकते.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

आयसीसी डब्ल्यूटीसी फायनल 2025 स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. सामन्याचे लाईव्ह स्टीमिंग जिओहॉटस्टार वेबसाइटवर असेल. मोबाइल वापरकर्ते जिओहॉटस्टार अॅपवर थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).