सचिन तेंडुलकरला 100 शतक पूर्ण करू न दिल्याने मिळाली जीवे मारण्याची धमकी, 2011 टेस्ट मॅचचा इंग्लंड गोलंदाजाने सांगितला किस्सा

इंग्लंड संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्ननने दावा केला आहे की, 2011 मध्ये कसोटी सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याचे 100 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करू न दिल्याने त्याला आणि ऑस्ट्रेलियन अंपायर रोड टकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सचिन तेंडुलकर विरुद्ध इंग्लंड 2011 (Photo Credit: Getty)

इंग्लंड संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्ननने (Tim Bresnan) दावा केला आहे की, 2011 मध्ये कसोटी सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) त्याचे 100 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करू न दिल्याने त्याला आणि ऑस्ट्रेलियन अंपायर रोड टकर (Rod Tucker) यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2011 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध आपले 99 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हलमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात त्याला शतकांचे शतक करण्याची संधी होती, मात्र त्याला टकरने 91 धावांवर ब्रेस्ननच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट दिले. ब्रेस्ननने 'यॉर्कशायर क्रिकेट: कव्हर्स ऑफ पॉडकास्ट' दरम्यान सांगितले की, “चेंडू कदाचित लेग साईडला जात होता आणि ऑस्ट्रेलियाचा अंपायर टकरने त्याला बाद केले. तो 80 च्या आसपास खेळत होता (प्रत्यक्षात 91) धावा करून खेळत होता आणि त्याने शतकाही ठोकले असते. आम्ही मालिका जिंकली आणि संघ जगात अव्वल संघ बनला." ('तुझं करिअर संपवेन', जेव्हा सचिन तेंडुलकरने 1997 वेस्ट इंडिज दौऱ्यावर ‘दादा’ सौरव गांगुलीला धमकावले)

2011/12 मध्ये सचिन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा नेहमीच त्याचे चर्चेचा विषय ठरला होता. तो म्हणाला, "आमच्या दोघांनाही पंच मला ठार मारण्याची धमकी मिळाली. मला ट्विटरवर धमकी मिळाली आणि लोकांनी त्यांच्या घराच्या पत्त्यावर पत्रे लिहिली. जिवे मारण्याच्या धमकसह लिहिले होते की, तुम्ही त्याला आऊट कसे दिले? चेंडू लेग साईडच्या बाजूने जात होता." ब्रेस्ननच्या म्हणण्यानुसार या धमक्या पाहता टकर यांना आपली सुरक्षा वाढवावी लागली. तो म्हणाला, “काही महिन्यांनंतर ते मला भेटले आणि म्हणाले, मित्रा मला एक सुरक्षारक्षक ठेवावा लागला."

प्रत्येकजण सचिनशी भावनिकरित्या जोडलेला असतो. त्याने शतक ठोकळ्यावर देशात उत्सवाचे वातावरण निर्माण व्हायचे आणि शतकाची संधी गमावल्यावर त्याच्यासह प्रत्येक फॅनही निराश होतो. या सामन्यात शतकांचे शतक ठोकण्याची संधी गमावलेल्या सचिनने 2012 आशिया कप सामन्यात बांग्लादेशविरुद्ध शतकी डाव खेळला आणि 100 शतकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. ऑक्टोबर 2013 मध्ये निवृत्त झालेला सचिन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात अनुक्रमे 15,921 आणि 18,426 धावा केल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now