Rohit Sharma Stats In Test Againts Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा असा आहे विक्रम, येथे पाहा 'हिटमॅन'ची आकडेवारी

IND vs BAN: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंची दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी 8 सप्टेंबरला संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team, Test Series 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 19 सप्टेंबरपासून लाल चेंडूंची दोन सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी 8 सप्टेंबरला संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच बांगलादेशचा संघ पाकिस्तानला त्याच्या घरच्या मैदानावर लोलवळं आहे . अशा स्थितीत बांगलादेशचा आत्मविश्वास खूप उंचावला असेल आणि बांगलादेश संघाला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल.

रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अजूनही पहिल्या स्थानावर आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडिया या मालिकेत पूर्ण गुण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील, कारण पुढील 4-5 महिन्यांत एकूण 10 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माचे फॉर्ममध्ये असणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 1st Test: 1300 दिवसांची प्रतीक्षा संपणार! पंतसोबतच चेन्नई कसोटीही 'या' खेळाडूसाठी असणार खास)

बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माचा कसा आहे रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये खूपच प्रभावी ठरली आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या हिटमॅनचे आकडे खूपच धक्कादायक आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध एकूण 3 सामने खेळले आहेत. या कालावधीत रोहित शर्माने तीन डावात 11 च्या सरासरीने केवळ 33 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक 21 धावांची खेळी खेळली आहे. आत्तापर्यंत रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 7 संघांविरुद्ध खेळला आहे. या काळात बांगलादेश हा एकमेव असा संघ आहे ज्याविरुद्ध रोहित शर्माच्या बॅटमधून अर्धशतक किंवा एकही शतक झळकलेले नाही.

रोहित शर्माच्या नावावर घरच्या मैदानावर कसोटीतील सर्वोत्तम विक्रम 

बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. कर्णधार रोहित शर्माचा घरच्या मैदानावरचा विक्रम चांगलाच राहिला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 29 कसोटी सामन्यांच्या 45 डावांमध्ये 61.59 च्या सरासरीने 2402 धावा केल्या आहेत. या कालावधीत रोहित शर्माने 10 शतके आणि 7 अर्धशतकांची खेळी केली आहे. दरम्यान, रोहित शर्माही सहा वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now