GT vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, एका क्लिकवर घ्या जाणून
गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.
Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे संध्याकाळी 7.30 सुरु होईल. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड (MI vs GT Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने तीन सामने जिंकले आहेत. तर, मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना गुजरात टायटन्सने सहा धावांनी जिंकला होता. मुंबई इंडियन्स यावेळी पुनरागमन करू इच्छितात. (हे देखील वाचा: MI vs GT IPL 2025 9th Match Winner Prediction: गुजरात की मुंबई कोणता संघ होणार आज विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट)
गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूंनी केला आहे कहर
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरुद्ध 4 डावात 66.67 च्या सरासरीने आणि 181.82 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या आहेत. या काळात सूर्यकुमार यादवने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 103 धावा आहे. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त, तिलक वर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध 4 सामन्यांमध्ये 175 च्या स्ट्राईक रेटने 91 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, अनुभवी ट्रेंट बोल्टने गुजरात टायटन्सविरुद्ध 5 सामन्यांमध्ये 7.88 च्या इकॉनॉमीने 3 बळी घेतले आहेत.
गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सविरुद्ध केली आहे अशी कामगिरी
गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार शुभमन गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 12 सामन्यांमध्ये 36.67 च्या सरासरीने आणि 149.66 च्या स्ट्राईक रेटने 440 धावा केल्या आहेत. या काळात मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम स्कोअर 129 धावा आहे. शुभमन गिल व्यतिरिक्त, जोस बटलरने मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 डावात 148.96 च्या स्ट्राईक रेटने 533 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, रशीद खानने मुंबई इंडियन्सविरुद्ध 6.10 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांची अशी आहे कामगिरी
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले आहेत. गुजरात टायटन्सने हे सर्व सामने जिंकले आहेत. या काळात मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. गुजरात टायटन्सने या मैदानावर एकूण 17 सामने खेळले आहेत. या काळात गुजरात टायटन्सने सामने जिंकले आहेत. आणि त्यांना 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथे सर्वाधिक धावांचा पाठलाग (207/7) आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने केला होता.
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2025 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

