Virat Kohli Replacement as Test Captain: विराट कोहलीच्या जागी टीम इंडियाचा कसोटी कर्णधार बनण्यासाठी ‘हे’ 3 दमदार खेळाडू आहेत दावेदार
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. जर विराट कोहली इंग्लंड विरोधात कसोटी मालिकेत प्रभावी निकाल देऊ शकला नाही तर त्याच्याकडून कसोटी कर्णधारपद हिसकावले जाऊ शकते. कसोटी क्रिकेटविषयी सांगायचे झाले तर असे 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी कर्णधार बनू शकतात.
Virat Kohli Replacement: न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावर पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. तसेच विराटच्या जागी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेला संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) आगामी पाच सामन्यांची कसोटी मालिका विराटसाठी महत्वाची मानली जात आहे. 2008 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने अखेर ब्रिटिश भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. त्यांनतर 2014 आणि 2018 इंग्लंड दौऱ्यावरील (England Tour) मालिकेत संघाला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे यंदा तरी भारतीय संघ (Indian Team) विराटच्या नेतृत्वात कमाल करते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (Cricket World Cup: 2023 वर्ल्ड कपनंतर ‘हे’ 5 युवा असू शकतात Team India कर्णधारपदाचे दावेदार, सुरु होणार विराट कोहलीच्या उत्तराधिकारीची रेस)
जर विराट कोहली इंग्लंड विरोधात कसोटी मालिकेत प्रभावी निकाल देऊ शकला नाही तर त्याच्याकडून कसोटी कर्णधारपद हिसकावले जाऊ शकते. कसोटी क्रिकेटविषयी सांगायचे झाले तर असे 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी कर्णधार बनू शकतात.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
रहाणे विराट कोहलीपेक्षा टीम इंडियासाठी एक चांगला कर्णधार सिद्ध होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौर्यावर विराट मायदेशी परतल्यावर रहाणेला संघाचे नेतृत्व देण्यात आले. आघाडीवरुन टीम इंडियाचे नेतृत्व करत प्रभारी कर्णधार अजिंक्यने मेलबर्नमध्ये शानदार शतक झळकावले व यानंतर कसोटी मालिकेत 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला. रहाणेने आजवर 5 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले असून चार सामने जिंकले आहेत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच फलंदाज म्हणूनही परदेशात रहाणेचा रेकॉर्ड विराटहून अधिक प्रभावी आहे.
केएल राहुल (KL Rahul)
2019 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळलेल्या अखेरच्या कसोटी मालिकेनंतर राहुल कसोटी संघात पुनरागमन करत आहे. राहुलकडे सध्या टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार म्हणून पहिले जात आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करणारा राहुल येत्या काही काळात नक्कीच भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार बानू शकतो. जर टीम मॅनेजमेंटने राहुलला कसोटीत कर्णधारपदाची संधी दिली तर तो यशस्वी ठरू शकतो. शिवाय विराट देखील एमएस धोनीप्रमाणे त्याला कर्णधारपदाचे प्रशिक्षण देऊ शकतो.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
टीम इंडियाचा महान गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कसोटी संघाची कमान दिली जाऊ शकते. अश्विनला कसोटी क्रिकेटचा चांगला अनुभव असून तो फॉरमॅटच्या बारीक-सारीक गोष्टी अधिक प्रभावीपणे समजतो. तसेच अश्विनकडे आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सच्या नेतृत्वाचा देखील अनुभव आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)