Most Successful Indian Captain In WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 'या' भारतीय कर्णधारांनी सर्वाधिक सामने जिंकले; पहा यादी

विराट कोहलीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 22 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. या काळात टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 14 कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीची विजयाची टक्केवारी 63.63 आहे.

Photo Credit- X

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, Test Series 2024: आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. उभय संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाला. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम (Tom Latham)करत आहे. (Rohit Sharma on Mohammed Shami: 'शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणं अशक्य...', रोहित शर्मा मोहम्मद शमीबद्दल मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला भारताचा कर्णधार ?)

या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे जाणून घेऊयात.

जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली तर रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. माजी कर्णधार विराट कोहलीने 2019 ते 2022 दरम्यान 22 जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये नेतृत्व केले. या काळात विराट कोहलीने भारतीय संघाला 14 विजय मिळवून दिले.

रोहित शर्माने आतापर्यंत 18 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत रोहित शर्माने टीम इंडियाला 12 विजय मिळवून दिले आहेत. आता टीम इंडियाने मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवले तर रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकेल.

कसोटीतील भारताचा चौथा सर्वात यशस्वी कर्णधार

टीम इंडियाने किवी संघाविरुद्धच्या तीनही कसोटी जिंकल्या तर रोहित शर्मा टीम इंडियाचा कसोटीत चौथा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. रोहित शर्मा या प्रकरणात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा (14 विजय, 47 सामने) विक्रम मोडेल. मोहम्मद अझरुद्दीनने 1990 ते 1997 पर्यंत 47 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. या काळात मोहम्मद अझरुद्दीनने 14 वेळा विजय मिळवला. सध्या या पदावर रोहित शर्मा (12 विजय, 18 सामने) कायम आहे.

चौथा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार

जर टीम इंडियाने या मालिकेतील सर्व सामने जिंकले तर रोहित शर्मा कर्णधार म्हणून सौरभ गांगुलीचा विक्रम मोडेल. सौरभ गांगुली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टीम इंडियाचा चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. सौरभ गांगुली (97 विजय, 196 आंतरराष्ट्रीय सामने) चौथ्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा (95 विजय, 128 आंतरराष्ट्रीय सामने) पाचव्या स्थानावर आहे.