Year Ender 2022: संपूर्ण वर्षी 'या' गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये गाजवले आपले वर्चस्व, जाणून घ्या कोणी घेतले सर्वाधिक विकेट
तसेच हे वर्ष क्रिकेटसाठी चढउताराचे राहिले आहे.
Year Ender 2022: जगभरात कसोटी क्रिकेट पाहणाऱ्यांची कमतरता नाही. क्रिकेटचा हा प्रकार चाहते मोठ्या उत्सुकतेने पाहतात. कारण या फॉरमॅटमध्ये खेळाडूची क्षमता नीट तपासली जाऊ शकते. कसोटी सामन्यांदरम्यान अनेक वेळा गोलंदाज स्वत:च आपल्या घातक गोलंदाजीने सामन्याचा कल आपल्याकडे खेचून घेतात. तसेच हे वर्ष क्रिकेटसाठी चढउताराचे राहिले आहे खास म्हणजे खेळाडूंसाठी चला तर मग आज आपण त्या गोलंदाजांबद्दल बोलू ज्यांनी 2022 मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक (Most Wicket 2022) विकेट्स घेतल्या आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत ते गोलंदाज.
कागिसो रबाडा (Kagiso Rabada)
दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये मारक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत कागिसो रबाडाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 8 सामन्यांच्या 14 डावांमध्ये प्राणघातक गोलंदाजी करताना 20.04 च्या सरासरीने 45 बळी घेतले आहेत.
नाथन लियोन (Nathan Lyon)
या यादीत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. दुसरीकडे, या वर्षी 2022 मध्ये, नॅथन लियॉनने 10 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 29.18 च्या सरासरीने एकूण 43 फलंदाजांना आपल्या फिरकीचे बळी बनवले आहेत. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test 2022: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातुन रोहित शर्मा बाहेर, पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार केएल राहुल)
जॅक लीच (Jack Leach)
या यादीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. लीच हा कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. या वर्षी 2022 मध्ये, जॅक लीचने आतापर्यंत 14 सामन्यांच्या 23 डावांमध्ये 39.44 च्या सरासरीने 43 बळी घेतले आहेत.