Pat Cummins Hat-Trick: पॅट कमिन्सच्या आधी या 6 गोलंदाजांनी T20 World Cup मध्ये घेतली हॅटट्रिक, जाणून घ्या कोणत्या गोलंदाजांनी केला हा पराक्रम

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी डकवर्थ-लुईस नियमानुसार सुपर 8 सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव (AUS Beat BAN) केला. या विश्वचषकात पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि येताच त्याने हॅटट्रिक (Pat Cummins Hat-Trick) घेत इतिहास रचला.

Pat Cummins (Photo Credit - X)

T20 World Cup Hat-Tricks: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) ऑस्ट्रेलियाने गुरुवारी डकवर्थ-लुईस नियमानुसार सुपर 8 सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव (AUS Beat BAN) केला. या विश्वचषकात पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि येताच त्याने हॅटट्रिक (Pat Cummins Hat-Trick) घेत इतिहास रचला. कमिन्सने दोन वेगवेगळ्या षटकांत या 3 विकेट घेतल्या, पण टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा खेळाडूंबद्दल ज्यांनी आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे, ज्यामध्ये ब्रेट ली सारख्या दिग्गजाचाही समावेश आहे. (हे देखील वाचा: ENG vs SA ICC T20 WC 2024 Super 8 Live Streaming: आज सुपर-8 चा ब्लॉकबस्टर सामना, जेव्हा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका येणार आमनेसामने; कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?)

पाहा व्हिडिओ

ब्रेट ली (Brett Lee)

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट ली हा पहिला गोलंदाज होता. 2007 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 3 फलंदाजांना बाद केले. त्याने शकीब अल हसन, मश्रफी मोर्तझा आणि आलोक कपालीचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेटने जिंकला.

कर्टिस कॅम्फर (Curtis Campher)

आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने 2021 विश्वचषकात नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सलग तीन नव्हे तर चार विकेट घेतल्या. त्याने कॉलिन अकरमन, रायन टेन ड्यूश, स्कॉट एडवर्ड्स आणि शेवटी रोएलॉफ व्हॅन डर मर्वे यांना बाद केले. आजपर्यंत, T20 विश्वचषकाच्या इतिहासात सलग 4 विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आयर्लंडने हा सामना 7 विकेटने जिंकला.

वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga)

2021 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा वानिंदू हसरंगा हा दुसरा गोलंदाज होता, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्कराम, टेंबा बावुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना सलग तीन चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. हसरंगाच्या हॅट्ट्रिकनंतरही श्रीलंकेने हा सामना 4 विकेट्सच्या फरकाने गमावला.

कागिसो रबाडा (Kagiso Rabada)

कागिसो रबाडाने 2021 विश्वचषकाची तिसरी हॅटट्रिक घेतली. इंग्लंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. रबाडाच्या घातक गोलंदाजीसमोर ख्रिस वोक्स, इऑन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांनी लागोपाठ तीन चेंडूंवर विकेट गमावल्या. रबाडाच्या संघाने, दक्षिण आफ्रिकेने हा सामना 10 धावांनी जिंकला.

कार्तिक मयप्पन (Karthik Meiyappan)

UAE लेगस्पिनर कार्तिक मयप्पनने 2022 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. भानुका राजपक्षे, चारिथ असालंका आणि दासुन शानका यांना बाद करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. या हॅट्ट्रिकनंतरही तो श्रीलंकेला 79 धावांनी विजयापासून रोखू शकला नाही.

जोशुआ लिटल (Josh Little)

टी-20 विश्वचषकात आयर्लंड दोन खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली होती. 2022 मध्ये, जोशुआ लिटलने न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनरला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. तरीही हा सामना आयर्लंडने 35 धावांनी गमावला.

पॅट कमिन्स (Patt Cumins)

पॅट कमिन्स हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि ताहिद हृदय यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून हा सामना 28 धावांनी जिंकला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now