भारतीय क्रिकेट विश्वातील 5 आश्चर्यकारक क्षण, अनेकांना स्वप्नवत वाटणारे पण प्रत्यक्षात घडलेले; तुम्हाला माहिती आहेत काय?
भारतातील क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मैदानावरील त्यांची कामगिरी असो किंवा मैदानाबाहेरील त्यांचे खाजगी आयुष्य चाहते नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये असे काही क्षण आहे ज्यांच्या चाहत्यांनाही माहिती नसेल आणि कदाचित ते जाणून हैराण होतील.
Indian Cricket Amazing Facts: भारतात क्रिकेटचे प्रचंड मोठ्याप्रमाणात अनुसरण केले जाते. देशभरात या खेळाचे कोट्यवधी चाहते आहेत आणि एका धर्माप्रमाणे याचे अनुसरण केले जाते. भारतातील क्रिकेट (Indian Cricket) चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मैदानावरील त्यांची कामगिरी असो किंवा मैदानाबाहेरील त्यांचे खाजगी आयुष्य चाहते नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. शिवाय, सोशल मीडियामुळे आता ते अधिक सोयीस्कर झाले आहेत परंतु भारतीय क्रिकेटमध्ये असे काही क्षण आहे ज्यांच्या चाहत्यांनाही माहिती नसेल आणि कदाचित ते जाणून हैराण होतील. इतकंच नाही तर ते अनेकवेळी बनावटी वाटू शकते पण प्रत्यक्षात घडलेले आहे. (IPL मध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम Virat Kohli याच्या नावावर, जाणून बसेल आश्चर्याचा धक्का)
अनधिकृत चेंडूवर विराट कोहलीने घेतली पहिली टी-20 विकेट
विराट कोहली (Virat Kohli) नेहमी आपल्या बॅटिंगसाठी चर्चेत राहतो पण सध्याचा भारतीय कर्णधार टी-20 क्रिकेटमध्ये अधिकृत चेंडू न टाकता विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. 31 ऑगस्ट 2011 रोजी भारत-इंग्लंड मधील टी-20 सामन्यात विराटने 8व्या ओव्हरचा पहिला चेंडू लेग-साईडला टाकाला जो की वाईड होता. यादरम्यान इंग्लंडच्या केविन पीटरसनचा तोल गेला व विकेटच्या मागून एमएस धोनीने त्याला स्टंप आऊट केलं. अशाप्रकारे विराटला पहिली टी-20 विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिका ए संघाकडून खेळला मनदीप सिंह
आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्स संघाकडून खेळणारा मनदीप सिंह (Mandeep Singh) दक्षिण आफ्रिका A संघाकडून बदली खेळाडू म्हणून खेळला आहे. 2015 भारत A आणि दक्षिण आफ्रिका A संघातील सामन्याच्या वेळी हा प्रसंग घडला. आफ्रिकी संघाचे चार खेळाडू पोटदुखीमुळे आजारी आजारी पडले त्यामुळे मनदीपला बदली खेळाडू म्हणून भारत A संघाविरुद्ध खेळावे लागले होते.
टॉप-10 टी-20 अष्टपैलूमध्ये विराट कोहलीचा समावेश
2017 मध्ये कोहलीचे नाव जगातील पहिल्या दहा टी-20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये सामील झाले होते. होय, आयसीसी टी-20 रँकिंगनुसार कोहली ला जगातील दहावे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये कोहलीने 190 गुणांची कमाई करत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दवावे स्थान पटकावले होते. आणखी एक विचित्र बाब म्हणजे 2017 मध्ये कोहलीने गोलंदाजी केली नव्हती तरीही अष्टपैलू क्रमवारीत 10वे स्थान मिळाले.
राहुल द्रविड स्कॉटलंडकडून खेळला
राहुल द्रविड (Rahul Dravid) कसोटी सामन्यांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे आणि त्याने कसोटी कारकीर्दीत 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा काढल्या आहेत. पण तरीही आपल्यापैकी किती जणांना हे माहित आहे की द्रविड खरोखर स्कॉटलंड कडून खेळला आहे? 2003 मध्ये, द्रविडने स्कॉटलंड संघासाठी 11 वनडे सामने खेळले. फलंदाजी दिग्गजने स्कॉटलंड संघासाठी 11 सामन्यात 600 धावा केल्या.
चार फलंदाजांनी सलामीला केली 408 धावांची भागीदारी
हे कसं घडलं याचाच विचार करताना ना? मे 2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) ढाका येथील शेरे बांग्ला राष्ट्रीय स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत बोर्डवर एकूण 610/3 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण यादरम्यान दोन नव्हे तर 4 फलंदाजांनी 408 धावांची भागीदारी करण्यास भारताला मदत केली. वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी भारताच्या बॅटिंगची सुरुवात केली. पण, त्यानंतर दिनेश कार्तिकने पहिल्या दिवशी चहा ब्रेकदरम्यान ‘निवृत्त’ होण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर द्रविड मैदानात उतरला संघाच्या 281 धावा असताना जाफर थकल्यामुळे रिटायर्ड झाला. अखेरीस सचिन तेंडुलकर द्रविडने संघाला 406 धावसंख्यापर्यंत मजल मारून दिली. द्रविड बाद झाल्यावर कार्तिक मैदानावर आला आणि 129 धावा करून आऊट होऊन माघारी परतला. सचिन 112 धावा करून नाबाद परतला. जाफरने 138 धावा केल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)