'भारतीय क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव', एमएस धोनीच्या समर्थनात मोहम्मद कैफ ने केले 'हे' मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघामध्ये एकजुटपणाचा अभाव असल्याचं मत मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने नुकतंच व्यक्त केलं.खेळाडूंची सतत होणारी आदलाबदल आणि नवे-नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाही
भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) एकजुटपणाचा अभाव असल्याचं मत मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने नुकतंच व्यक्त केलं.खेळाडूंची सतत होणारी आदलाबदल आणि नवे-नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाही, त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला अपेक्षे प्रमाणे कामगिरी करत आली नाहीये. कैफने Helo अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडले. कैफने माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले आणि म्हणाला, "आमच्यावेळी सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे." कैफ म्हणाला की "आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते." (भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! ऑगस्ट अखेरीस टी-20 मालिका खेळण्यास BCCI-दक्षिण आफ्रिका बोर्ड तयार)
टी-20 विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, "भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू संघात खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघाला शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहे. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो तेव्हा मी समजेण त्याच्यातील क्रिकेट संपले आहे."
कैफने या दरम्यान, धोनीच्या भविष्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. कैफच्या म्हणण्यानुसार धोनीकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही आणि केएल राहुल हा विकेटकीपर म्हणून संघासाठी दीर्घकालीन पर्याय नाही. गेल्या एक वर्षापासून धोनी क्रिकेट खेळत नाही यामुळे फरक पडत नाही, असा दावा कैफने केला आहे, कारण धोनी एक महान खेळाडू आहे आणि जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा त्याला आपली लय मिळवता येते. कैफ म्हणाला की, 39 वर्षीय धोनीकडे असूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि त्याच्या अनुभवामुळे टीम इंडियाला खूप फायदा होऊ शकतो, त्यामुळे धोनीची जागा घेता येणार नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)