IND vs AUS 3rd ODI Playing XI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत रोहित-विराटचे पुनरागमन, अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) तिसर्या वनडेसाठी टीम इंडियात परतणार आहेत. या खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) तिसऱ्या वनडेत पुनरागमन करत आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये (Rajkot) खेळला जाणार असून ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत आपली लाज वाचवण्याची शेवटची संधी आहे. दोन्ही संघांसाठी हा एकदिवसीय सामनाही महत्त्वाचा ठरणार आहे कारण विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांचा हा शेवटचा एकदिवसीय सामना आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) तिसर्या वनडेसाठी टीम इंडियात परतणार आहेत. या खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) तिसऱ्या वनडेत पुनरागमन करत आहे.
शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर तिसऱ्या सामन्यातून विश्रांती
शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाड आशियाई क्रीडा 2023 साठी भारतीय संघ सोडून चीनला रवाना झाले आहेत. विश्वचषक संघाचा भाग असलेला अक्षर पटेल सध्या दुखापतीतून सावरत असून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरूमध्ये आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd ODI Weather Report: राजकोटमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण, जाणून घ्या तिसऱ्या वनडेत कसे असेल हवामान?)
इशान- रोहित येणार सलामीला
शुभमन गिलला ओपनिंगमध्ये आधीच विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे इशान किशन कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करू शकतो. गिल आणि गायकवाड ओपनिंग करत असताना इशान खाली खेळत होता. पण गिलच्या जाण्यानंतर आता ईशान पुन्हा ओपनिंगमध्ये येऊ शकतो. रोहित नक्कीच पुनरागमन करत आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर मधल्या फळीत आहेत. राहुल आणि अय्यर यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे पण प्रत्येक चाहत्याला तिसऱ्या वनडेत विराटची फलंदाजी पाहायला आवडेल.
रवींद्र जडेजाला मिळू शकते विश्रांती
अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर खेळेल आणि रवींद्र जडेजाला अंतिम सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अश्विनने गेल्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. अशा स्थितीत अश्विनला तिसरी वनडेही मिळू शकते. गोलंदाजीत कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये प्रवेश मिळू शकतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत टीम इंडिया अंतिम वनडेमध्ये प्रवेश करू शकते.
तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा/रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

