IPL Auction 2024: आयपीएलच्या मिनी लिलाव मंगळवारी होणार दुबईत, भारताच्या 'या' 5 खेळाडूंवर असणार सर्वाच्या नजरा
ज्याबाबत सर्व फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावण्यास तयार आहेत. या लिलावासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
IPL Auction 2024: आयपीएल 2024 लिलावासाठी (IPL Auction 2024) 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आयपीएल 2024 चा लिलाव मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये (Dubai) होणार आहे. ज्याबाबत सर्व फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावण्यास तयार आहेत. या लिलावासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघांना खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर होती. मुंबई इंडियन्स, (MI) केकेआर, (KKR) आरसीबीसह (RCB) अनेक मोठ्या संघांनी 10 हून अधिक खेळाडूंना सोडले आहे. आगामी आयपीएल लिलावात असे काही अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ सर्वाधिक पैसे खर्च करू शकतो. भारताचे काही खेळाडूही लिलावात उतरणार आहेत, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.
हर्षल पटेल
आरसीबीने आयपीएल -2022 पूर्वी वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. हरियाणाच्या या वेगवान गोलंदाजानेही आरसीबीसाठी चांगली कामगिरी करत मोसमात 19 बळी घेतले. यानंतर 2023 च्या मोसमात त्याने 14 विकेट घेतल्या पण इकॉनॉमी रेट 9.65 होता. मात्र, फ्रँचायझीने त्याला सोडले. हर्षलची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.
शार्दुल ठाकूर
भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरलाही केकेआरने 2024 हंगामापूर्वी सोडले होते. 2023 च्या मोसमात त्याने 11 सामन्यात 1 अर्धशतकाच्या मदतीने 113 धावा केल्या आणि 7 विकेट्स घेतल्या. शार्दुलची मूळ किंमतही 2 कोटी रुपये आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Tentative Schedule: आयपीएल 2024 संदर्भात मोठे अपडेट, जाणून घ्या पहिला सामना कधी होणार)
चेतन साकारिया
2021 पासून या लीगमध्ये खेळत असलेला युवा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने गेल्या मोसमात केवळ 2 सामने खेळले आणि 3 बळी घेतले. 2022 मध्येही त्याला केवळ 3 सामने मिळाले ज्यात त्याने 3 विकेट घेतल्या. चेतनने 2021 मध्येच भारतीय संघासाठी पदार्पण केले होते परंतु आतापर्यंत तो 1 वनडे आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला आहे.
शिवम मावी
अंडर-19 विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर शिवम मावीला केकेआरने 3 कोटी रुपयांना विकत घेतले. 2018 मध्ये, त्याने केकेआरसाठी पदार्पण केले पण त्याला फक्त 5 विकेट घेता आल्या. या 25 वर्षीय खेळाडूने भारतासाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शिवमने लिलावात त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवली आहे.
मनीष पांडे
आयपीएल-2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध 114 धावांची तुफानी इनिंग खेळणाऱ्या मनीष पांडेवरही सर्वांच्या नजरा असतील. तो आरसीबी, पुणे वॉरियर्स, केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा भाग आहे. त्याची मूळ किंमत 50 लाख आहे.