IPL Auction 2025 Live

‘जेवढा मोठा धक्का, तेवढं मोठं कमबॅक’! दुखापतग्रस्त Shreyas Iyer ने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिले वचन, पहा Tweet

क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडला असला तरी अय्यरने आपण पुन्हा एकदा पुनरागमन करू असा विश्वास वर्तवला आहे. श्रेयस ट्वीट करून म्हणाला, “जेवढं मोठा धक्का, तेवढं मोठं पुनरागमन, असं म्हणलं जातं. मी लवकरच परत येईन.”

श्रेयस अय्यर दुखापत (Photo Credit: PTI)

Shreyas Iyer Injury: दुखापत कोणत्याही खेळाचा एक भाग असते. जेव्हा एखादा क्रीडाप्रकाराने आपला देश अव्वल होईल हे सुनिश्चित करण्यासाठी खेळाडू सर्वोत्तम प्रयत्न करतात तेव्हा शरीरावर कधीकधी ताण निर्माण होतो. आणि, 23 मार्च 2021 रोजी, इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या एकदिवसीय सामन्यात बॉलला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) उडी मारली, ज्यामुळे त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे आता मुंबईकर फलंदाजाला मालिकेच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांना मुकावे लागणार आहे. पुणे येथे झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग करत असताना अय्यरचा डावा खांदा निखळल्यामुळे आता त्याच्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे अशास्थितीत, आता तो किमान चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडला असला तरी अय्यरने आपण पुन्हा एकदा पुनरागमन करू असा विश्वास वर्तवला आहे. (IPL 2021: आयपीएल 14 साठी Shreyas Iyer फिट झाला नाही तर, कॅप्टन्सी भूमिकेसाठी Delhi Capitals कडे आहेत ‘हे’ 5 पर्याय)

श्रेयस ट्वीट करून म्हणाला, “जेवढं मोठा धक्का, तेवढं मोठं पुनरागमन, असं म्हणलं जातं. मी लवकरच परत येईन. मी आपले संदेश वाचत आहे आणि सर्व प्रेम व समर्थनाने मी भारावून गेलो आहे. मनापासून सर्वांना धन्यवाद.” अय्यरच्या दुखापतीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी 14व्या हंगामातून त्याला माघार घेणे भाग पडले आहे. दरम्यान, श्रेयसने मागील आठवड्यातच इंग्लंड काऊंटी टीम लँकाशायरसोबत एकदिवसीय स्पर्धेसाठी करार केला होता. रॉयल लंडन कप ही स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे, पण या स्पर्धेसाठीही श्रेयस फिट होईल की नाही हे सांगणे अद्याप तरी कठीण दिसत आहे. इंग्लंडच्या डावात आठव्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर जॉनी बेयरस्टोने ड्राईव्ह शॉट खेळला जो रोखण्यासाठी अय्यरने उडी मारली आणि त्याला दुखापत झाली. यानंतर लगेच तो मैदानातून बाहेर पडला आणि हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं ज्यामध्ये त्याचा खांदा निखळल्याचं समोर आलं.

दरम्यान, अय्यरच्या दुखापतीचा आता सूर्यकुमार यादवला फायदा होऊ शकतो. इंग्लंड टी-20 मालिकेनंतर सूर्यकुमार आता वनडे क्रिकेटमध्ये देखील पदार्पण करू शकतो. शिवाय, श्रेयस आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असल्यामुळे आता त्याच्या जागी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, आर अश्विन किंवा स्टिव्ह स्मिथ यांच्यापैकी एकाला नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.