CSA Board Resigns: दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळातील सर्व सदस्यांचा राजीनामा
इंग्लंडचा संग पुढच्या महिन्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. याआधीच दक्षिण क्रिकेट मंडळामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
क्रिकेट विश्वाला एक मोठा धक्का बसला असून दक्षिण आफ्रिकेच्या किक्रेट मंडाळातील (Board of Cricket South Africa) सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. माजी कार्यकारी अध्यक्ष ब्रेसफोर्ड विल्यम्स यांच्यासह ६ संचालकांनी रविवारी झालेल्या बैठकीनंतर राजीनामा होता. इतर चार जणांनी सोमवारी पदत्याग केला आहे. क्रिकेटच्या हितासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे, असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून आता देशातील ऑलिम्पिक समिती याबाबत कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सध्या रिहान रिचर्ड्स तात्पुरत्या काळासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यामुळे क्रिकेट मंडळातील मुख्य अधिकाऱ्याला राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी चौकशी समितीदेखील नेमण्यात आली होती. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, सरकारने दबाव टाकल्यानंतर आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला हा अहवाल सार्वजनिक करावा लागला होता. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? पाहा काय म्हणाले, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन
ट्विट-
दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन नोव्हेंबरपासून घरेलू सत्राला सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संग पुढच्या महिन्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. याआधीच दक्षिण क्रिकेट मंडळामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.