Terror Attack During Cricket Match in Pakistan: पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यादरम्यान दहशतवाद्यांनी केला गोळीबार; खेळाडू आणि प्रेक्षक बचावले- रिपोर्ट

पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा एकदा दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. स्थानिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनेक दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळीबार केला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहट विभागातील ओरकझई जिल्ह्यातील द्रादर ममाजई भागात अमन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही धक्कादायक घटना घडली.

क्रिकेट बॉल । प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोरमध्ये 2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात बरेच लोक ठार झाले, तर श्रीलंकेचे क्रिकेटपटू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट एका दशक क्रिकेट बंद झाले होते. कोणताही आंतराष्ट्रीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन तेथे खेळण्यास तयार नव्हता, परंतु गेल्या काही वर्षांत क्रिकेट पाकिस्तानमध्ये (Cricket in Pakistan) परतले आहे. या दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा एकदा दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. स्थानिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनेक दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळीबार केला. The Daily Star च्या अहवालानुसार पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील कोहट विभागातील ओरकझई जिल्ह्यातील द्रादर ममाजई (Dradar Mamazai) भागात अमन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कोविड-19 काळात अमन क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी राजकीय कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्यासह प्रेक्षक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ('भारतासोबत खेळण्यास तयार पण त्यासाठी BCCI च्या मागे धावणार नाही!' PCB अध्यक्ष एहसान मनी यांची भूमिका)

सामना सुरू होताच अतिरेक्यांनी जवळच्या टेकडीवरुन मैदानात उघडपणे गोळीबार सुरू केला. आनंदाची गोष्ट म्हणजे खेळाडू, प्रेक्षक आणि पत्रकार इथून पळून जाऊन आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. एका दर्शकाने अहवालात पुढे सांगितले की, गोळीबार अशा प्रकारची घडत होती की आयोजकांना सामना रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने सांगितले की जवळच्या डोंगरातून गोळीबाळी सुरू होताच प्रत्येकजण कव्हरकडे पळायला लागले. मात्र या घटनेत अद्याप कोणाच्याही मृत किंवा जखमीचे वृत्त समोर आले नाही.

दहशतवाद्यांनी पाकिस्तान क्रिकेटसाठी गोष्टी खूप कठीण केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोठे संघ तेथे भेट देऊ इच्छित नाही, यामुळे पाकिस्तानला जवळपास एक दशकासाठी युएईमध्ये त्यांच्या घरातील सामने खेळावे लागले. 2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट टीमच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथील परिस्थिती खालावली आणि सर्व मोठ्या संघांनी पाक दौर्‍यावर जाण्यास नकार दिला. तथापि, गेल्या काही वर्षांत गोष्टी पुन्हा सावरण्यास सुरवात झाली होती. श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेशने गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानचा दौरा केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now