Team India 'या' दिवशी T20 World Cup 2022 साठी होणार रवाना, 4 खेळाडूंचा खर्च उचलणार BCCI

T20 विश्वचषक संघात समाविष्ट असलेले खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नसतील, त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात लवकर पोहोचण्याची संधी असेल.

Team India (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) साठी अवघे काही दिवस राहिले आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, मायदेशी भारताला आस्ट्रेलिया (AUS) आणि दक्षिण आफ्रिके (SA) विरुध्द टी-20 (T20) मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकाआधी चांगली तयारी करण्याची ही संधी मिळाली आहे. माहितीनुसार टीम इंडिया (Team India) 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका संपेल, त्यानंतर टीम इंडिया विश्वकपसाठी रवाना होईल. T20 विश्वचषक संघात समाविष्ट असलेले खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नसतील, त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियात लवकर पोहोचण्याची संधी असेल. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियासोबत स्टँड बाय खेळाडूही ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ज्यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे.

आयसीसी फक्त संघाचा उचलते खर्च 

आयसीसी टूर्नामेंटमध्ये, आयसीसीकडूनच संघांना प्रवासाचे फायदे दिले जातात, त्यामुळे भारताच्या 15 खेळाडूंच्या संघाला ही संधी मिळेल. म्हणजेच स्टँडबायमधील चार खेळाडूंना स्वखर्चाने बीसीसीआयला न्यावे लागेल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही स्वत:च करावी लागेल. संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला उर्वरित संघासह स्टँडबाय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यास सांगितले आहे. जेणेकरून सराव सत्र, सराव सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूला काही समस्या आल्यास, स्टँडबाय खेळाडूला तात्काळ संघाशी जोडता येईल. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करेल का?, कर्णधार रोहित शर्माने दिले अचूक उत्तर)

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif