India Squad for South Africa T20I Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, रमणदीप, विजयकुमार आणि यशदयाल मिळाली संधी
दुसरीकडे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही अभिषेक शर्मा अपयशी ठरत होता, मात्र आता त्याला दक्षिण आफ्रिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
IND vs SA T20I Series 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मयंक यादव आणि शिवम दुबे यांची संघात अनुपस्थिती चिंतेची बाब असून, त्यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही. तसेच रियान परागची संघात निवड करण्यात आलेली नाही, असेही बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत 40 चेंडूत शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने सध्या टी-20 संघात आपले स्थान राखून ठेवले आहे. दुसरीकडे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही अभिषेक शर्मा अपयशी ठरत होता, मात्र आता त्याला दक्षिण आफ्रिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
रमणदीप सिंगची संघात निवड
वरुण चक्रवर्तीने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपल्या गूढ गोलंदाजीने पुनरागमन केले आणि 5 बळी घेतले. यश दयाल, विजय कुमार विशाक आणि रमणदीप सिंग यांचीही संघात निवड करण्यात आली असून ते या आगामी मालिकेत पदार्पण करू शकतात. इमर्जिंग टीम्स आशिया चषक स्पर्धेत भारत अ संघासाठी बॅट आणि बॉलसह रमणदीपने चांगली कामगिरी केली. उपांत्य फेरीत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 64 धावांची खेळी केली होती. याशिवाय त्याने या स्पर्धेत गोलंदाजीतही 3 बळी घेतले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- डर्बन (8 नोव्हेंबर)
दुसरी टी-20 सामना- गकबेर्हा (10 नोव्हेंबर)
तिसरा टी-20 सामना- सेंच्युरियन (13 नोव्हेंबर)
चौथा टी-20 सामना- जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल