India Women vs Pakistan Women, 7th Match Live Streaming: टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध आज 'करो या मरो'चा सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग
अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या आशा वाचवण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.
India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: 2024 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत (ICC Womens T20 World Cup 2024) भारतीय महिला संघाला विजयी सुरुवात करता आली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यताही धोक्यात आली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला अ गटातील आपले उर्वरित तीन सामने जिंकणे (IND vs PAK) आवश्यक झाले आहे. टीम इंडियाचा पुढचा सामनाही हरला तर ते या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडेल. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या आशा वाचवण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे वर्चस्व आहे. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 15 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 12 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ तीन वेळा विजय मिळवता आला आहे.
कधी आणि कुठे होणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा सामना रविवार, 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. (हे देखील वाचा: Sunday Cricket Matches: सुपर संडेसाठी व्हा सज्ज! भारत एकाच दिवसात भिडणार पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत; चाहत्यांची उत्सुकता शिगेला)
कुठे पाहणार सामना लाइव्ह
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. डिस्ने हॉटस्टार ॲपवर तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
टीम इंडियाचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.