ICC T20 विश्वचषकपूर्वी पुन्हा एकदा समोर आली टीम इंडियाची ‘ही’ सर्वात मोठी समस्या, नाही काढला तोडगा तर हाती लागणार पुन्हा निराशा
ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षअखेरीस टी-20 वर्ल्ड कप 2022 होणार आहे. आणि 2021 विश्वचषकपूर्वी जी समस्या भारतीय संघाला भेडसावत होती, तीच समस्या आता भारतीय संघासमोर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मधल्या फळीची अडचण पुन्हा एकदा समोर अली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मधल्या फळीमुळे भारताला या मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागल्याची कबुली दिली आहे.
गेल्या वर्षी माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) पहिला आणि अंतिम टी-20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला. या स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ (Indian Team) स्पर्धेत आगेकूच करू शकला नाही. या स्पर्धेत टीम इंडियाला (Team India) मधल्या फळीत आक्रमक फलंदाजांची कमतरता जाणवली. आघाडीची फळी फेल झाल्यावर मधल्या फळीतील खेळाडू देखील योगदान देण्यात अपयशी ठरले ज्यामुळे संघाला निर्णायक सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पहायला लागले. आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) या वर्षअखेरीस आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2022 चे आयोजन होणार आहे. असंच काहीसं पुन्हा एकदा टीम इंडियासोबत घडत आहे. 2021 विश्वचषकपूर्वी जी समस्या भारतीय संघाला भेडसावत होती, तीच समस्या आता भारतीय संघासमोर आहे. (IND vs SA 3rd ODI: चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा सफाया, तिसऱ्या वनडेत अवघ्या 4 धावांच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने काबीज केली मालिका)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) मधल्या फळीची अडचण पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रिषभ पंतचा चौथ्या क्रमांकावर प्रयोग केला गेला. तथापि पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या मध्ये 85 आणि तिसऱ्या सामन्यात तोपुन्हा खराब शॉट खेळून शून्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर उतरला. अय्यरने पहिल्या सामन्यात 17, दुसऱ्या सामन्यात 11 आणि तिसऱ्या सामन्यात 26 धावा केल्या. याशिवाय पहिल्या दोन सामन्यांमध्ये 6 व्या क्रमांकावर असलेल्या व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली, जो पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात 22 धावाच करू शकला. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली, ज्याने 39 धावा काढल्या. यादरम्यान प्रश्न असा उद्भवतो की व्यंकटेश अय्यरला जर वरच्या फळीत फलंदाजी करताना पाहून त्याची संघात निवड झाली तेव्हा त्याला खाली फलंदाजीला का पाठवले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मधल्या फळीमुळे भारताला या मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागल्याची कबुली दिली आहे.
याशिवाय दुसरा प्रश्न असा आहे की श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर चांगल्या धावा केल्या आहेत, तर मग या मालिकेत पंतचा चौथ्या क्रमांकावर का प्रयोग केला गेला? भारतासोबत असे अनेकदा घडते की, संघाचे आघाडीचे तीन फलंदाज धावा करू शकले नाहीत, तर संघ अर्धा सामना तिथेच गमावतो. यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवरील दबाव वाढतो जे हाताळण्यात ते अपयशी ठरतात. या वर्षी टी-20 आणि त्यानंतर पुढील वर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. अशा स्थितीत संघाच्या मधल्या फळीत सुधारणा करावी लागेल. हार्दिक पांड्या, एक अष्टपैलू म्हणून नसला तरी, तुमच्याकडे दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर आहेत ज्यांना तयार करून संघाला पुढे जाण्याची गार आहे. याशिवाय Proteas विरुद्ध मालिकेत व्यंकटेश अय्यरसोबत असेच घडले आहे. त्याला अधिक गोलंदाजीची संधी मिळाली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)