Team India देऊ शकते 'या' स्फोटक फलंदाजाला T20 World Cup 2022 साठी संधी, जाणून घ्या कशी होती कामगिरी
या स्पर्धेसाठी भारत संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघात समावेश करू शकतो.
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारतीय संघाची प्रभावी कामगिरी झाली नाही. सुपर फोरमधील दोन सामन्यांत पाकिस्तान (PAK) आणि श्रीलंकेकडून (SL) त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे टीम इंडिया (Team India) या स्पर्धेतून बाहेर पडली. भारतीय संघाची नजर आता 2022 च्या टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2022) असेल. या स्पर्धेसाठी भारत संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघात समावेश करू शकतो. संजूला अजून फारशी संधी मिळालेली नाही. मात्र संधी मिळाल्यावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. संजूने टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने 296 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक अर्धशतक ठोकले आहे. संजूने भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 23 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी खेळली होती. याआधी त्याने आयर्लंडविरुद्ध 42 चेंडूत 77 धावा केल्या होत्या.
यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनला भारताने आशिया कपसाठी संघात स्थान दिले नाही. टीम इंडियाने ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकचा संघात समावेश केला होता. पण पंतने निराशाजनक कामगिरी केली. मोठ्या सामन्यांमध्ये तो फार काही करू शकला नाही. त्यामुळे पंतला वगळून भारत सॅमसनला 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान देऊ शकतो. कार्तिक हा अनुभवी खेळाडू आहे. मात्र असे असूनही तो फारसा खेळू शकला नाही. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: या 4 खेळाडूंच्या जागा निश्चित; उर्वरित 11 ठिकाणी कोणाला मिळू शकते संधी, घ्या जाणून)
संजूने आयपीएलमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 138 सामन्यांमध्ये त्याने 3526 धावा केल्या आहेत. यादरम्यान सॅमसनने 3 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. या लीगमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी 119 धावांची आहे. त्याने आयपीएलमध्ये 279 चौकार आणि 158 षटकार मारले आहेत.