WTC Points Table: टीम इंडियाने एकाच दिवसात घेतली दुहेरी झेप, फायनलचा मार्ग झाला सोपा
या सामन्यापूर्वी भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता पण या शानदार विजयानंतर टीम इंडियाला फायदा झाला आहे.
WTC Points Table: रविवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या पॉइंट टेबलमध्ये (WTC Point Table) मोठा बदल दिसून आला आहे. टीम इंडियाला (Team India) एकाच दिवसात दुहेरी फायदा झाला आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) चट्टोग्राम कसोटीत 188 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यापूर्वी भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता पण या शानदार विजयानंतर टीम इंडियाला फायदा झाला आणि टीम तिसऱ्या स्थानावर पोहोचली. इतकंच नाही तर झेप घेतली, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाला दुहेरी फायदा झाला.
टीम इंडियाने एकाच दिवसात घेतली दुहेरी झेप
टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. यानंतर त्याचा अंतिम सामना खेळण्याचा मार्गही सुकर होताना दिसत आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेन कसोटीत आफ्रिकेचा वाईट पद्धतीने पराभव केल्यानंतर अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. भारताचा विजय आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेलाही धक्का बसला आहे, जो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. जर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील उर्वरित दोन सामने गमावले तर टीम इंडियाचा मार्ग सुकर होऊ शकतो. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st Test 2022: सामनावीर कुलदीप यादवची याची खदखद, 'सीनियर्स खेळाडूंमुळे बसावे लागले बाहेर')
काय आहे पॉइंट टेबलची स्थिती?
पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया 13व्या सामन्यात 9व्या विजयासह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय भारतीय संघ आता 55.77 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याच वेळी, ब्रिस्बेन कसोटी गमावल्यानंतर, दक्षिण आफ्रिका आता 54.5 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. श्रीलंकेचे 53.33 विजयी टक्के गुण आहेत आणि ते चौथ्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंड गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.