IND vs NZ 1st Test Day 4 Live Streaming: दुसऱ्या डावात टीम इंडियाची स्थिती मजबूत, न्यूझीलंडपेक्षा अजूनही 125 धावांनी मागे, येथे जाणून घ्या चौथ्या दिवसाचा खेळ कोणत्या ओटीटी आणि चॅनलवर पाहणार

टीम इंडिया अजूनही न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी मागे आहे. टीम इंडियासाठी विराट कोहली 70 धावा करून बाद झाला. सरफराज खान 70 धावांवर नाबाद खेळत आहे.

IND vs NZ (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. खेळला 9.15 वाजता सुरूवात होईल. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी मागे आहे. टीम इंडियासाठी विराट कोहली 70 धावा करून बाद झाला. सरफराज खान 70 धावांवर नाबाद खेळत आहे.

भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंड तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात दहा विकेट गमावून 402 धावांवर बाद झाला. यासह न्यूझीलंडने 356 धावांची मोठी आघाडी घेतली. (हे देखील वाचा: Rishabh Pant Injury Update: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या कधी फलंदाजी करणार)

कधी अन् कुठे पाहणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक क्षणाची माहिती पाहता येईल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टी.आय.