IND W Beat IRE W 2nd ODI Match Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी केला पराभव, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी; मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे.

IND W (Photo Credit - X)

India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Match Scorecard Update: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी रोजी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे. (हे देखील वाचा: Ira Jadhav Triple Century: मुंबईच्या मुलीची कमाल! महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत झळकावले त्रिशतक, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला)

त्याआधी, स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी आली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने 102 धावांची शानदार खेळी केली. या शानदार खेळीदरम्यान, जेमिमा रॉड्रिग्जने 91 चेंडूत 12 चौकारही मारले. जेमिमा रॉड्रिग्ज व्यतिरिक्त हरलीन देओलने 84 चेंडूत 89 धावा केल्या.

ओर्ला प्रेंडरगास्टने आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आयर्लंडकडून ओर्ला प्रेंडरगास्ट आणि अर्लीन केली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जॉर्जिना डेम्पसीसह ओर्ला प्रेंडरगास्ट आणि आर्लीन केली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आयर्लंड संघाला विजयासाठी 50 षटकांत 371 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त 32 धावांवर पहिला मोठा धक्का बसला. 50 षटकांत सात विकेट गमावल्यानंतर आयर्लंड संघाला फक्त 254 धावा करता आल्या. आयर्लंडसाठी, कुल्टर-रेलीने 80 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान, कुल्टर-रेलीने 113 चेंडूत 10 चौकार मारले. कुल्टर-रेली व्यतिरिक्त, सलामीवीर सारा फोर्ब्सने 38 धावा केल्या.

दुसरीकडे, सायली सातघरेने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा व्यतिरिक्त प्रिया मिश्राने दोन विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Coulter Reilly cricket women Gaby Lewis in w vs ir w ind vs ire ind vs ire w ind vs ire women ind vs ireland women IND W ind w vs ire w 2025 IND W vs IRE W 2025 Pitch Report IND W vs IRE W 2025 Preview ind w vs ire w 2nd odi 2025 IND W vs IRE W 2nd ODI 2025 Preview IND W vs IRE W Key Players IND W vs IRE W Key Players To Watch Out ind w vs ire w live streaming IND W vs IRE W Preview Ind-w vs IRE-w Ind(W) india vs ireland women's odi india w vs ireland w India Women National Cricket Team India Women vs Ireland Women India women's national cricket team Indian Women indian women team Ireland Ireland Women Ireland Women National Cricket Team ireland women team Ireland Women vs Indian Women Ireland Women vs Indian Women 2nd ODI Ireland Women vs Indian Women Details Ireland Women vs Indian Women Streaming Niranjan Shah Stadium Pitch Report ODI Series pratika rawal Rajkot Rajkot Weather Richa Ghosh Saurashtra Cricket Association Stadium Saurashtra Cricket Stadium pitch report Sayali Satghare Smriti Mandhana women cricket आयर्लंड आयर्लंड महिला आयर्लंड महिला संघ आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ कुल्टर रेली भारतीय महिला भारतीय महिला संघ भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ राजकोट राजकोट हवामान एकदिवसीय मालिका सायली सातघरे

Share Now