IPL Auction 2025 Live

T20 World Cup: टीम इंडियाचे 2016 टी-20 वर्ल्ड कप संघाचे ‘हे’ 10 स्टार सदस्य 2021 मध्ये खेळणार नाहीत

आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कपची शेवटची आवृत्ती 2016 मध्ये आयोजित झाली असून साहजिकच, त्या संघाचा भाग असलेले सर्व 15 भारतीय खेळाडू आगामी स्पर्धेचा भाग नसतील. 2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे तब्बल 10 खेळाडू यंदाच्या स्पर्धेतून आऊट झाले आहेत.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

2021 टी -20 वर्ल्ड कप (T20 World Cup) यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रमुख चर्चेचा मुद्दा आहे आणि सर्व संघ या स्पर्धेसाठी रणनीती आखत आहेत. आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कपची  (ICC Men's T20 World Cup) शेवटची आवृत्ती 2016 मध्ये आयोजित झाली असून ती देखील भारतीय बोर्डाने (BCCI) आयोजित केली होती. मात्र, यंदा देशात कोरोना व्हायरसची स्थिती पाहता स्पर्धा देशाबाहेर हलवण्यात आली आहे. भारताने (India) सभ्य खेळ केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला जिथे त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले. साहजिकच, त्या संघाचा भाग असलेले सर्व 15 खेळाडू आगामी स्पर्धेचा भाग नसतील. (ICC T20 World Cup Schedule 2021: आयसीसी टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, इथे पहा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक)

2016 मध्ये आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे (Indian tTeam) तब्बल 10 खेळाडू यंदाच्या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. यापैकी काही खेळाडूंनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

एमएस धोनी (MS Dhoni)

धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यामुळे तो आगामी स्पर्धेत भाग घेणार नाही. अखेरच्या स्पर्धेदरम्यान त्याने पाच सामन्यांत 89 धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध साखळी सामन्याच्या शेवटच्या सामन्यात मुस्तफिजूर रहमानला धावबाद करण्याचा अद्भुत प्रयत्न चाहत्यांना दीर्घकाळ लक्षात राहील.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अश्विन कसोटी फॉरमॅटमध्ये भारताच्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणून खाली जाईल आणि हे चांगल्या कारणास्तव आहे कारण त्याने 413 विकेट्स घेतल्या आहेत. पण टी-20 आंतरराष्टीय क्रिकेटबाबत असे बोलले जाऊ शकत नाही. अश्विन आंतरराष्ट्रीय टी-20 स्तरावर भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 46 टी -20 मध्ये 19.7 च्या सरासरीने 52 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनला 2017 त्याला वगळण्यात आले. 2016 टी -20 वर्ल्ड कप दरम्यान त्याने पाच सामन्यात चार विकेट्स घेतल्या. तसेच सध्या स्थिती पाहता आगामी स्पर्धेत त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

आयपीएलमध्ये रहाणेची कामगिरी पूर्वीइतकी चांगली राहिली नाही. शिवाय, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सारख्या इतरांच्या उदयामुळे त्याच्या संधींना फटका बसला आहे. त्याने भारतासाठी शेवटचा टी -20 सामना 2016 मध्ये खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या या फलंदाजाला त्याच्या सध्याच्या संघात सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये खात्रीशीर स्थान नाही. 2016 टी-20 विश्वचषकात रहाणेने एक सामना खेळला जेव्हा त्याला शिखर धवनच्या जागी उपांत्य फेरीत संधी मिळाली. त्याने 35 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या.

युवराज सिंह (Yuvraj Singh)

भारताच्या महान मर्यादित षटकांपैकी एक खेळाडू, अलिकडच्या वर्षांत भारताने उचललेल्या टी-20 आणि वनडे विश्वचषक विजयात युवीने मोठी भूमिका बजावली. 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराजचा वेळ खूपच खराब होता. त्याने चार सामन्यांमध्ये फक्त 100 च्या स्ट्राइक रेटने फक्त 52 धावा केल्या आणि एक विकेट घेतली. 2019 मध्ये निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी 2017 मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले होते.

शिखर धवन (Shikhar Dhawan)

भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर ‘गब्बर’ची स्थिती देखील रहाणेप्रमाणेच आहे. धवन सध्या फॉर्मशी संघर्ष करत आहे. तसेच राहुल, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ या युवा खेळाडूंच्या उपस्थितीतने त्याची यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2021 खेळण्याची शक्यता कमी केली आहे.

मनीष पांडे (Manish Pandey)

मनीष पांडेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2020 मध्ये एकमेव टी-20 सामना खेळला. त्यानंतर आयपीएल 2021 मध्ये तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. शिवाय, मधल्या फळीत टीम इंडियाकडे आता ईशान किशन व सूर्यकुमार यादव असे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे मनीषचा विचारही केला जाईल याची शक्यता कमी आहे.

सुरेश रैना (Suresh Raina)

एमएस धोनी प्रमाणेच रैनाने देखील गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना चकित केले. रैना धोनीच्या नेतृत्वात 2016 टी-20 वर्ल्ड कप खेळला पण ठसा उमटवू शकला नाही. रैनाने पाच सामने खेळले ज्यात त्याने फक्त 41 धावा केल्या.

हरभजन सिंह (Harbhajan Singh)

भज्जी भारतात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचाही भाग होता पण त्याने एकही सामना खेळला नाही. यानंतर अश्विन-जडेजा व नंतर युजवेंद्र चहल व कुलदीप यादवच्या फिरकी जोडीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. हरभजनच्या खराब फॉर्मने देखील यात भूमिका बजावली.

आशिष नेहरा (Ashish Nehra)

भारताच्या 2016 टी-20 वर्ल्ड कप संघातील निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंपैकी नेहरा एक आहे. गेल्या स्पर्धेत नेहराने पाच सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.

पवन नेगी (Pawan Negi)

नेगीने 2016 रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर 2016 आशिया कप स्पर्धेत युएई विरुद्ध भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण तो संघात जास्तकाळ आपले स्थान टिकवू शकला नाही. आयसीसी टी -20 विश्वचषक 2016 साठी भारतीय संघात त्याची निवड झाली.