Team India T20 World Cup 2022 Full Schedule: सलामीच्या सामन्यात भारत-पाकिस्तान महासंग्राम; पहा टी-20 विश्वचषकात टीम इंडिया कधी, कोणाशी भिडणार

टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गट 2 मध्ये आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2022 India Full Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळणार आहे. स्पर्धेचे पहिले 6 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सामना खेळवला जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होतील. आयसीसी टी-20 विश्वचषकची  (ICC T20 World Cup) आठवी आवृत्ती 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी स्पर्धेचे सामने खेळले जातील. 13 नोव्हेंबर रोजी MCG येथे अंतिम सामना खेळवला जाईल. (T20-World Cup 2022: ICC कडून T20-World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर, चाहते सामन्याचे खरेदी करु शकतात टिकीट)

सुपर 12 साठी संघ दोन गटात विभागले गेले आहेत. गट 1 मध्ये सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. दुसरीकडे भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गट 2 मध्ये आहेत.  पहिल्या फेरीच्या निकालानंतर या 8 संघांव्यतिरिक्त आणखी 4 संघ सुपर 12 मध्ये पोहोचतील. गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलिया 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरोधात सुपर 12 मध्ये स्पर्धेची मोहीम सुरु करेल. या स्पर्धेत 16 आंतरराष्ट्रीय संघ एकूण 45 सामने खेळणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे उपांत्य फेरी सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी खेळले जातील. तर अंतिम विजेतेपदाचा सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड - 23 ऑक्टोबर

भारत विरुद्ध गट अ उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड - 27 ऑक्टोबर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम - 30 ऑक्टोबर

भारत विरुद्ध बांगलादेश, अ‍ॅडलेड ओव्हल - 2 नोव्हेंबर

भारत विरुद्ध गट ब उपविजेता, मेलबर्न - 06 नोव्हेंबर



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif