IPL Auction 2025 Live

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग XI वर Virat Kohli चा ‘सस्पेन्स’, हाय व्होल्टेज मॅचपूर्वी केलं मोठं वक्तव्य

या हाय-वोल्टज सामन्यापूर्वी बाबर आजमच्या पाकिस्तानने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तर शनिवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की तो आज भारतीय इलेव्हनची घोषणा करणार नाही.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आजमच्या (Babar Azam) नेतृत्वातील संघांनी भारत  (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात रविवारी होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी तयारी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पाच वर्षांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येण्यास सज्ज आहेत. भारत आयोजित 2016 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये दोन्ही संघात यापूर्वी आमना-सामना झाला होता. क्रिकेट विश्वातील या हाय-वोल्टज सामन्यापूर्वी बाबर आजमच्या पाकिस्तानने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तर शनिवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेदरम्यान टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली म्हणाला की तो आज भारतीय इलेव्हनची (India XI) घोषणा करणार नाही. विराट कोहली विश्वचषक दरम्यान खेळपट्टीच्या गुणवत्तेविषयी म्हणाला, “आयपीएलच्या तुलनेत आपल्याला वर्ल्ड कप दरम्यान चांगल्या खेळपट्ट्या मिळतील. आयसीसी स्पर्धांमध्ये खेळपट्टीचा दर्जा राखणे आवश्यक असते. दवचा प्रभाव नक्कीच सामन्यात दिसून येईल.” (IND vs PAK, T20 World Cup 2021: भारताविरुद्ध हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, बाबर आजमने या खेळाडूंवर लावला दाव)

भारत पाकिस्तान सामन्याबाबत बाहेरील वातावरणातील फरकाबद्दल बोलताना विराट म्हणाला, “आम्ही बाहेरील वातावरणापासून मुक्त नाही पण मैदानाच्या आत आणि बाहेर शक्य तितका संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो.” याशिवाय हार्दिक पंड्याच्या फिटनेस आणि गोलंदाजीबाबत विराट म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर हार्दिक पंड्याची प्रकृती सतत सुधारत आहे. आणि विश्वचषक दरम्यान तो आमच्यासाठी दोन षटके टाकू शकतो. सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. त्याला फक्त फलंदाज म्हणून प्लेइंग -11 मध्ये समाविष्ट केले जाईल. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो आमच्यासाठी जे करतो हे एका दिवसात बदलता येणार नाही.”

दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्ध माइंड गेम खेळताना कोहली म्हणाला की, आमच्यावर कोणतेही अतिरिक्त दडपण नाही आणि आम्ही कोणतेही विशेष नियोजन करत नाही. कोहली म्हणाला की, स्टेडियमचे वातावरण नक्कीच वेगळे असेल, पण आमच्या विचारात आणि तयारीत कोणताही बदल झालेला नाही. उल्लेखनीय आहे की टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने झाले आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे रविवारचा सामना या दृष्टीनेही खास आहे. कारण टी-20 विश्वचषकातील दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना आहे. आणि दोन्ही संघ सामना जिंकून विजयी सुरुवात करून पाहत असतील.