T20 World Cup 2021: भारतात कोविडमुळे 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजनावर अनिश्चितता, UAE मध्ये स्पर्धा हलवली जाण्याचा PCB चा अजब दावा
2021 मधील टी-20 वर्ल्ड कपची पुढील आवृत्ती भारतातून युएई येथे हलवली जाण्याची शक्यता असल्याचा अजब दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी केला आहे. पुढील वर्षी भारत मेगा स्पर्धेचे आयोजन करणार आहे पण खान यांना वाटते की देशातील कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे भारत स्पर्धेचे आयोजन कारण्याचे हक्क सोडून देईल.
T20 World Cup 2021: 2021 मधील टी-20 वर्ल्ड कपची (World Cup) पुढील आवृत्ती भारतातून (India) युएई (UAE) येथे हलवली जाण्याची शक्यता असल्याचा अजब दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी केला आहे. पुढील वर्षी भारत मेगा स्पर्धेचे आयोजन करणार आहे पण खान यांना वाटते की देशातील कोरोना व्हायरस (India Coronavirus) परिस्थितीमुळे भारत स्पर्धेचे आयोजन कारण्याचे हक्क सोडून देईल. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) आयोजित होणार होते मात्र कोरोना महामारीमुळे (COVID-19 Pandemic) ते 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे तर पुढील वर्षी भारतात वर्ल्ड टी-20 चे आयोजन केले जाईल. भारतात दररोज हजारो ताजी प्रकरणे अजूनही नोंदली जात आहेत आणि काही राज्यांमध्ये या संसर्गजन्य विषाणूची दुसरी लाट असल्याचे आधीच समोर येत असल्याने पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी खान यांना असे वाटते की पुढच्या वर्षी भारत या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार नसेल. (ICC T20 World Cup 2021: भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे अनावरण, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले- ‘21 ही भारताची वेळ आहे’)
“कोकिड परिस्थितीमुळे भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. ते युएईमध्ये असू शकते," खान यांनी Cricket Baaz यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. 2021 च्या पहिल्या तिमाहीत भारत इंग्लंडविरुद्ध मालिका आणि आयपीएल आयोजित करणार असल्याची आठवण करून देत खान म्हणाले की, एप्रिलपर्यंतच चित्र स्पष्ट होईल. आयसीसीने 2021 वर्ल्ड टी-20 आयोजित करण्याचे अधिकार भारताला दिलेकेले आहे आणि ऑस्ट्रेलिया 2022 मध्ये आवृत्तीचे आयोजन करेल, तरभारत2023 मध्ये होणाऱ्या 50 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करेल. पीसीबी जानेवारीत आयसीसी आणि बीसीसीआय कडून लिखित पुष्टीची प्रतीक्षा करीत असल्याचेही खान यांनी या मुलाखतीत सांगितले.
गेल्या आठवड्यात आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या ऑनलाईन बैठकीत श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याची वेळ निश्चित केली होती. परंतु आवश्यकतेनुसार तारखांचे वेळापत्रक निश्चित केले जाऊ शकते. “पुढील एशिया कप जून महिन्यात श्रीलंकेत होणार असून 2022 आशिया चषक स्पर्धेसाठी आता आम्हाला होस्टिंगचे हक्क मिळाले आहेत,” खान म्हणाले. दोन्ही देशांमधील सीमा तणावामुळे भारताशी द्विपक्षीय मालिका अद्याप वास्तवात नसलं तरी, कोणत्याही जागतिक स्पर्धेत सर्व देशांच्या सहभागाची हमी देण्याची जबाबदारी आयसीसीची आहे असेही खान म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)