IPL Auction 2025 Live

Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्याने पुन्हा वाढवले टीम इंडिया टेंशन, खांद्याला दुखापत झाल्यामुळे स्कॅनसाठी नेण्यात आले

यामुळे त्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला लागला. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की त्याला स्कॅनसाठी घेण्यात आले आहे.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) पहिल्याच सामन्यातून भारतासाठी (India) एक वाईट बातमी समोर येत आहे. यामुळे त्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत नाही हा संघासाठी चिंतेचा विषय होताच. शिवाय तो लवकरच बरा होईल आणि या विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल अशी अपेक्षा होती. पण पाकिस्तानविरुद्ध सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत (Shoulder Injury) झाली. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला लागला. बीसीसीआयने (BCCI) याबाबत माहिती दिली आणि सांगितले की त्याला स्कॅनसाठी घेण्यात आले आहे. बीसीसीआयने म्हटले, “हार्दिक पांड्याला फलंदाजी करताना उजव्या खांद्याला मार लागला. तो आता स्कॅनसाठी गेला आहे.” भारतीय डावात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा (Shaheen Afridi) वेगवान चेंडू खांद्याला लागल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध दुसऱ्या डावात हार्दिक फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. ईशान किशन त्याच्या जागी क्षेत्ररक्षण करताना दिसला. (IND vs PAK, T20 World Cup 2021: विराट कोहलीवर बाबर आजम वरचढ, भारताला 10 विकेटने नमवून पाकिस्तानने बदलला इतिहास, टी-20 विश्वचषकात विजयी सलामी)

भारताने फलंदाजी करून 151/7 धावसंख्येत हार्दिक आठ चेंडूत 11 धावाच करू शकला. पांड्या आणि कर्णधार विराट कोहली या दोघांनीही यापूर्वी सांगितले होते की अष्टपैलू खेळाडूचा स्पर्धेत कधीतरी गोलंदाज म्हणून वापर करण्याचा त्यांचा हेतू आहे. विराट कोहलीने शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “हार्दिक त्या स्थितीत पोहोचत आहे जिथे तो स्पर्धेदरम्यान काही षटके गोलंदाजी करू शकतो.” भारतीय कर्णधाराने सांगितले की, त्याने हार्दिक पांड्याला फलंदाज म्हणून नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि तो संघासाठी खूप मौल्यवान आहे. “तो एक फलंदाज म्हणून सहाव्या क्रमांकावर जे करतो ते आपण रात्रभरात निर्माण करू शकत नाही. त्याला नेहमीच एक फलंदाज म्हणून पाठीशी घातले आहे. त्याने आणलेले मूल्य आम्हाला माहीत आहे, तो ते करण्यात तज्ज्ञ आहे, प्रभाव डाव खेळू शकतो. त्याला असे काहीतरी करण्यास भाग पाडण्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहे ज्यासाठी तो तयार नाही,” कोहली म्हणाला.

दरम्यान, टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. भारताने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज दीडशतकी भागीदारीच्या जोरावर 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय संघावर मात केली आहे.