IPL Auction 2025 Live

Syed Mushtaq Ali Trophy 2021: श्रीसंतच्या स्लेजिंगला मुंबईकर यशस्वी जयस्वालने या अंदाजात दिलं सडेतोड प्रत्युत्तर, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल कमाल है!

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईच्या डावातील 6व्या ओव्हरदरम्यानची आहे.

एस श्रीसंत आणि यशस्वी जयस्वाल (Photo Credit: Twitter)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे (Syed Mushtaq Ali Trophy) भारतीय घरगुती क्रिकेटला सुरुवात झाली आहे. या टी-20 स्पर्धेत तरुण खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून सुरुवातीपासूनच उत्साह वाढवला आहे. स्पर्धेदरम्यान बर्‍याच खेळाडूंनी शतके ठोकली, अनेक गोलंदाजांनी आपल्या वेगवान चेंडूने त्रास दिला, तर काही खेळाडू स्लेजिंग करतानाही दिसले. असेच काहीसे मुंबई (Mumbai) आणि केरळ (Kerala) यांच्यातील सामन्यादरम्यान घडले. केरळकडून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा एस श्रीसंतने (S Sreesanth) मुंबईचा सलामीवीर यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) स्लेजिंग केले तर या युवा खेळाडूने एक नव्हे तर दोन षटकारांसह अनुभवी वेगवान गोलंदाजाला सडेतोड उत्तर दिले आणि चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईच्या डावातील 6व्या ओव्हरदरम्यानची आहे. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी शानदार फटका मारण्याच्या प्रयत्नात होता मात्र चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही. यानंतर, श्रीशांतने यशस्वीला स्लेज करण्यास सुरवात केली. या युवा खेळाडूने देखील मागे वळून पहिले नाही आणि श्रीसंतच्या ओव्हरमध्ये एक चौकार व दोन मोठे षटकार लगावले. यशस्वीने या दरम्यान 40 धावा केल्या. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: मोहम्मद अझहरुद्दीनचे तुफानी टी-20 शतक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत सेन्चुरी ठोकणारा कोण आहे केरळ फलंदाज, जाणून घ्या)

आयपीएल 2013 मधील बंदीमुळे श्रीसंतला क्रिकेटच्या मैदानावरून बाहेर पडावे लागले होते मात्र, जेव्हा त्याच्यावरील बंदी हटवण्यात आल्याच्या 7 वर्षानंतर आता त्याने क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. श्रीसंतने या सामन्यात 29 धावा देत एक विकेट घेतली. पण लक्षात घेण्यासारखे म्हणजे या मॅचमध्ये श्रीसंत आपल्या जुन्या अंदाजात दिसला. मुंबईने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 196 धावा केल्या होत्या, मात्र संघाला विजय मिळवून देण्यास त्या पुरेशा ठरल्या नाही. केरळने मोहम्मद अझरुद्दीनच्या तुफानी शतकाच्या जोरावर 15.5 ओव्हरमध्ये मोठा विजय नोंदवला. केरळने 8 विकेटने हा सामना जिंकला आणि अझरुद्दीने नाबाद 137 धावा केल्या. पहा श्रीसंतच्या स्लेजिंग हा व्हिडिओ:

दरम्यान, मुंबई आणि केरळ ई गटात आहेत. केरळचा सलग दुसरा विजय होता तर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी, पहिल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. केरळप्रमाणे दिल्लीने देखील सलग दोन सामने जिंकले असून सध्या दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर आहेत.