Syed Mushtaq Ali Trophy 2021: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 च्या दोन अंतिम संघाचा आज निर्णय; तमिळनाडू-राजस्थान, बरोदा-पंजाब यांच्यात चुरशीची लढाई

आज, 29 जानेवारी रोजी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोचणाऱ्या दोन संघांची घोषणा होईल. सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 चा पहिला उपांत्य सामना सामना तमिळनाडू आणि राजस्थानच्या संघात होणार आहे, तर दुसरा सेमीफायनल सामना बरोदा आणि पंजाब संघात याच मैदानावर खेळला जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Syed Mushtaq Ali Trophy 2021: 10 जानेवारी रोजी सुरु झालेला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा (Syed Mushtaq Ali Trophy) 2021 हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आज, 29 जानेवारी रोजी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोचणाऱ्या दोन संघांची घोषणा होईल. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) होणाऱ्या दोन्ही सेमीफायनल सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाच्या प्रवासावर ब्रेक लागेल तर विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 चा पहिला उपांत्य सामना सामना तमिळनाडू (Tamil Nadu) आणि राजस्थानच्या (Rajasthan) संघात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजेपासून मोटेरा स्टेडियमवर खेळला जाईल, तर दुसरा सेमीफायनल सामना बरोदा (Baroda) आणि पंजाब (Punjab) संघात याच मैदानावर संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. अशाप्रकारे अंतिम फेरीत होणाऱ्या दोन संघ आज निश्चित होतील. आयपीएलचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यापूर्वी सर्व खेळाडू फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असतील. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: पंजाब, तामिळनाडू, बरोदा, राजस्थान संघाची दमदार कामगिरी; सेमीफायनलमध्ये कोणात संघ कोणाशी लढणार?)

राजस्थानाकडे महिपाल लोमरोरसारखातज्ज्ञ टी-20 फलंदाज आहेत तर दीपक आणि राहुल चाहरसह गोलंदाजी विभागात रवी बिश्नोई, खलील अहमद आणि अनिकेत चौधरी आहेत. राहुलने 11 विकेट घेतल्या आहेत तर फलंदाज अंकित लांबाने सर्वाधिक 198 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, एन जगदीशनने तमिळनाडूसाठी 100 च्या सरासरीने 322 धावा केल्या आहेत. कर्णधार दिनेश कार्तिकने अजूनही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे पण मोठ्या सामन्यात तमिळनाडूला त्याच्याकडून बर्‍याच अपेक्षा असतील. सी हरी निशांत, बाबा अपराजित आणि केबी अरुण कार्तिक यांनाही चांगली खेळी करण्यासाठी प्रयत्नशील असतील. गोलंदाजीत मुरुगन अश्विन आणि आर साई किशोर यांच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असेल तर अपराजितनेही प्रभावित केले.

दुसऱ्या सेमीफायनल सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब आणि बरोदा यांच्यातील सामन्यात सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्माचे आव्हान विष्णू सोलंकीसाठी सोपे जाणार नाही. हरियाणाविरुद्ध रोमांचक क्वार्टर-फायनल सामन्यात सोलंकीने शेवटच्या चेंडूवर शानदार हेलिकॉप्टर शॉट खेचून सर्वांची मने जिंकली तर प्रभासिमरमी सिंहने पंजाबकडून 100 च्या सरासरीने 326 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत सिद्धार्थ कौलने 13 विकेट घेतल्या आहेत. बरोदाला गोलंदाजीत लुकमान मेरीवाला, पास्टशेठ, भार्गव भट आणि निनाद राठवा यांच्याकडून कामगिरीची अपेक्षा असेल तर केदार देवधर आणि सोलंकी यांच्यात बॅटने चुरशीची लढाई पाहायला मिळेल. देवधरने जवळपास 90 च्या सरासरीने 269 धावा केल्या आहेत.