Syed Mushtaq Ali Trophy 2021: मनीष पांडे कर्नाटक संघाचा कर्णधार, IPL च्या युवा स्टारचा देखील 20 सदस्यीय संघात समावेश
आयपीएलच्या शानदार मोसमानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि देवदत्त पडिक्कल यांना 20 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. 2018-19 आणि 2019-20 मध्ये कर्नाटकने सलग जेतेपदे जिंकली.
भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) कर्नाटक संघात परतला आणि आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 2021/22 स्पर्धेसाठी त्याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Syed Mushtaq Ali T20 Trophy) स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात होणार आहे. ही टी-20 स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रोजी खेळली जाणार आहे. आणि यासाठी कर्नाटक (Karnataka) संघ जाहीर करण्यात आला आहे. आयपीएलच्या (IPL) शानदार मोसमानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना 20 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे, तर केएल राहुल (KL Rahul) टी-20 विश्वचषक खेळत असल्यामुळे त्याला वगळला आले आहे. तसेच गेल्या वर्षी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या आणि आयपीएल 2021 मध्ये अलीकडेच सनरायझर्स हैदराबाद संघासाठी अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा मनीष पांडे पुन्हा एकदा कर्नाटक संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: अजिंक्य रहाणेच्या हाती मुंबईची धुरा, पृथ्वी शॉ उपकर्णधार; पहा संपूर्ण संघ)
मयंक अग्रवाल आणि देवदत्त पडिक्क्ल आयपीएल 2021 मध्ये जोरदार फॉर्ममध्ये होते. मयंकला काही दुखापतीचा सामना करावा लागला पण स्पर्धेखेरीस तो लयीत परतला. दोन्ही तडाखेबाज सलामी फलंदाजांचा फॉर्म कर्नाटक संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. दरम्यान मनीष पांडेच्या जागी गेल्यावर्षी करुण नायरने कर्नाटक संघाचे नेतृत्व केले होते. पण यंदा पांडे खेळण्यास तंदुरुस्त असल्याने नायरला फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहेत. याशिवाय गेल्या वर्षी कर्नाटकचा उपकर्णधार असलेल्या पवन देशपांडेला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर अभिमन्यू मिथुनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2018-19 आणि 2019-20 मध्ये कर्नाटकने सलग जेतेपदे जिंकली. तथापि, गेल्या हंगामात पंजाबविरुद्ध पराभवासह उपांत्यपूर्व फेरीत त्यांचे जेतेपदाची स्वप्न भांग झाले. कर्नाटकचा पहिला सामना 4 नोव्हेंबरला मुंबईशी होणार आहे.
कर्नाटक SMAT 2021/22 पथक:
मनीष पांडे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, केव्ही सिद्धार्थ, रोहन कदम, अनिरुद्ध जोशी, अभिनव मनोहर, करुण नायर, शरथ बीआर, निहाल उल्लाल, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गौतम, जगदीशा सुचित, प्रवीण दुबे, केसी करिअप्पा, प्रसिध्द कृष्णा , प्रतीक जैन, वैशाख विजयकुमार, एमबी दर्शन, विद्याधर पाटील.