MS Dhoni on Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर एमएस धोनीची पहिली प्रतिक्रिया, मॅनेजरने दिली माहिती

या बातमीने धोनीलाही धक्का बसला. “जे घडले त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी माझे दुःख व्यक्त करण्याची स्थितीत नाही. माही देखील खूप खिन्न झाला आहे. अशी दुर्दैवी घटना," अरुणने एबीपी आनंदला सांगितले.

एमएस धोनी आणि सुशांत सिंह राजपूत (Photo Credit: Instagram)

तो आतून दुखी होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. परिणाम इतका गहन होता की त्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला कष्टापासून दूर केले. रविवारी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे आत्महत्येने निधन झाले आणि ही बातमी सर्वांना मोठा धक्का बनली. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (MS Dhoni: The Untold Story) या सिनेमात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh DhonI) याची भूमिका उत्तमपणे साकारलेल्या अभिनेत्याचे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून रोहित शर्मा या प्रत्येक क्रिकेटपटूने सोशल मीडियावर बातमी ऐकल्यानंतर मोठा धक्कादायक प्रतिक्रिया दिली. या बातमीने धोनीलाही धक्का बसला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीचा मॅनेजर अरुण पांडेने (Arun Pandey) सांगितले की, सुशांतच्या मृत्यूच्या बातमीमुळे 38 वर्षीय धोनी अतिशय शोकग्रस्त झाले. आणि बायोपिकमध्ये ज्या प्रकारे स्वत:ची व्यक्तिरेखा साकारली आणि चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान त्याने दाखवलेल्या समर्पणाच्या स्तरामुळे सुशांतचा तो खूप प्रशंसक होता हेही अरुण यांनी उघड केले. (Sushant Singh Rajput Dies: जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या फलंदाजीने प्रभावित झाला होता सचिन तेंडुलकर, पाहा काय म्हणाला होता)

“जे घडले त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी माझे दुःख व्यक्त करण्याची स्थितीत नाही. माही देखील खूप खिन्न झाला आहे. अशी दुर्दैवी घटना," अरुणने एबीपी आनंदला सांगितले. ते पुढे म्हणाले, "सुशांत केवळ 34 वर्षांचा होता आणि एक समृद्ध करिअर त्याची वाट पाहत होता, मला याबद्दल काहीही शंका नाही. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात." धोनीच्या बायोपिकसाठी तयारी करताना सुशांत धोनी आणि त्याच्या कुटुंबासोबत 15 दिवस होता.

अरुण पुढे म्हणाला की, पडद्यावर धोनीची भूमिका साकारणे सोपे नव्हते परंतु धोनी आणि त्याच्या जवळच्यांनी सुशांतसाठी ते सोपे बनवले आणि त्यांना हे माहित होते की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तो सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे. दरम्यान, सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालात म्हटले आहे की सुशांतचा वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या झाल्यामुळे मृत्यू झाला. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वडील बिहारच्या पटनाहून निघून गेल्यामुळे सोमवारी (15 जून) मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. रविवारी रात्री कुटुंबातील काही जण मुंबईला आले.