T20 Captains of India: सूर्यकुमार यादव भारताचा 13 वा कर्णधार, आतापर्यंत 'या' खेळाडूंनी केले आहे टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी विचारपूर्वक पुढच्या विश्वचषकापर्यंत सूर्याकडे टी-20 कर्णधारपद सोपवले आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) कर्णधार बनवले आहे. वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2026 पर्यंत भारतीय संघाचा कर्णधार असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी विचारपूर्वक पुढच्या विश्वचषकापर्यंत सूर्याकडे टी-20 कर्णधारपद सोपवले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) खूप निराश झाला आहे कारण 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 मध्ये भारताचा पुढचा कर्णधार मानला जात होता. (हे देखील वाचा: IND vs SL Live Streaming Details: काय सांगता! 'या' युक्तीने तुम्ही भारत-श्रीलंका मालिकेतील सामने पाहू शकता विनामूल्य, येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील)
'या' कारणांमुळे सूर्याला कर्णधारपद मिळाले
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी टी-20 फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यामागे बराच विचार केला आहे. हार्दिकला हटवून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यामागे अनेक मोठी कारणे आहेत. प्रथम, सूर्याला फिटनेसची कोणतीही समस्या नाही आणि तो बहुतेक सामन्यांमध्ये उपलब्ध असेल. दुसरे म्हणजे, कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची संघात स्वीकारार्हता हार्दिक पांड्यापेक्षा जास्त आहे. तिसरे, या फॉरमॅटमध्ये सूर्या हा जगातील अव्वल फलंदाज आहे आणि त्याने एकट्याने सामना भारताच्या बाजूने वळवला आहे. यामुळे तो संघाला प्रेरणादायी नेतृत्व देऊ शकतो. चौथे, सूर्याचे सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंशी चांगले संबंध आहेत.
टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंची यादी
आत्तापर्यंत एकूण 14 खेळाडूंनी टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. सूर्यकुमार यादव यांचा 13वा क्रमांक आहे. सूर्याने 7 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. 14वा कर्णधार शुभमन गिल होता त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर 5 सामन्यात नेतृत्व केले. टी-20 मध्ये भारताचा पहिला कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता. त्याने 1 सामन्यात कर्णधारपद भूषवले. 72 सामन्यांमध्ये दुसरा कर्णधार एमएस धोनी, 3 सामन्यात सुरेश रैना, 2 सामन्यात चौथा कर्णधार अजिंक्य राहाने, 50 सामन्यांमध्ये पाचवा कर्णधार विराट कोहली, 63 सामन्यात सहावा कर्णधार रोहित शर्मा, 3 सामन्यात सातवा कर्णधार शिखर धवन, 5 सामन्यात आठवा कर्णधार ऋषभ पंत, 16 सामन्यात नववा कर्णधार हार्दिक पांड्या, दहावा कर्णधार केएल राहुल त्याने भारताच्या 1 सामन्यात कर्णधारपद पटकावले आहे, 11वा कर्णधार जसप्रीत बुमराह 3 सामन्यात, बारावा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 3 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.