Surgical Strike 2: भारतीय क्रिकेटर खेळाडूंकडून वायूसेनेने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे ट्वीटरवरुन कौतुक
पुलवामा (Pulwama) भ्याड हल्ल्याचे आज भारतीय वायूसेनेने (Indian Air Force) पाकिस्तानला (Pakistan) प्रतिउत्तर देत मोठी कारवाई केली आहे. यामुळे सर्व भारतीयांकडून वायूसेनेच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
Surgical Strike 2: पुलवामा (Pulwama) भ्याड हल्ल्याचे आज भारतीय वायूसेनेने (Indian Air Force) पाकिस्तानला (Pakistan) प्रतिउत्तर देत मोठी कारवाई केली आहे. यामुळे सर्व भारतीयांकडून वायूसेनेच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. त्यात आता भारतीय क्रिकेट खेळाडूंनी ही वायूसेनेचे ट्वीटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे.
भारतीय वायूसेनेने पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसुन जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्य तळ उडवून लावले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचसोबत बालाकोट,चाकोटी आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
या स्थितीत आता भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने ट्वीट करुन असे म्हटले आहे की, 'जय हिंद इंडियन एअरफोर्स'
तर माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने. तरुणांनी खुपच चांगली खेळी केली आहे असे म्हटले आहे.
त्याचसोबत मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने ट्वीटकरुन वायूसेनेला सलाम असे म्हटले आहे.
पाकिस्तावर भारतीय वायूसेनेने केलेल्या या कारवाईनंतर भारतीय सुरक्षा कंपन्यांन्या पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीसह वायु सुरक्षा प्रणाली यांनी हाय अलर्ट जाहीर केले आहे.