IPL 2020: आयपीएलमध्ये 200 सामने खेळणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला सुरेश रैनाने दिल्या शुभेच्छा; इंस्टाग्रामवर शेअर केला 'हा' फोटो

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज शेख जायद स्डेडिअमवर आयपीएलचा 37वा सामना सुरु आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आपला 200 वा सामना खेळणार आहे.

एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) यांच्यात आज शेख जायद स्डेडिअमवर आयपीएलचा 37वा सामना सुरु आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आपला 200 वा सामना खेळणार आहे. तसेच आयपीएलमध्ये 200 सामने खेळणार महेंद्र सिंह धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वातून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यातच या हंगामात वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर असलेल्या सुरेश रैना (Suresh Raina) यानेही महेंद्र सिंह धोनी सोबतचा एक फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केले आहे.

महेंद्र सिंह धोनी हा जगातील पहिला खेळाडू आहे, ज्याने आयपीएलचे 200 सामने खेळले आहे. याबद्दल मी त्याचे कौतूक करतो. भविष्यात आपणांस भरभराटीचे यश मिळो. तू नेहमी आम्हाला अभिमानाची जाणीव करून दिली आहे, अशा अशायाचे सुरेश रैनाने ट्विट केले आहे. हे देखील वाचा- Avi Kadam Passes Away: जवळचा मित्र अवि कदम यांच्या निधनावर सचिन तेंडुलकर झाले भावूक; ट्विटरवर केली 'अशी' पोस्ट

सुरेश रैना इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

The first ever player to play his 200th match in IPL, Best of luck for today @mahi7781 Bhai .. Wishing you loads of success. You always make us proud 💪. #yellove💛 #chennaisuperkings #whistlepodu

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून महेंद्र सिंह धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आठ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या तीन किताब जिंकले आहेत. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात चेन्नच्या संघाचा मुंबईच्या संघाकडून केवळ एका धावानी पराभव झाला होता. तसेच बंदीच्या कालावधीत धोनीने 2016 मध्ये पुणे सुपर जॉईंट संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, 2017 मध्ये पुणे सुपर जॉईंटसंघाकडून खेळत असताना धोनीने कर्णधार पदाची जबाबदारी झटकली होती. त्यावेळी स्टीव्ह स्मिथ पुण्याच्या संघाचे नेतृत्व केले होते

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now