Super Smash 2019-20: न्यूझीलंडच्या लिओ कार्टर याने अँटोन डेविचविरुद्ध एका ओव्हरमध्ये जडले सहा षटकार, 'ही' कामगिरी करणारा बनला 7वा फलंदाज
न्यूझीलंडच्या डोमेस्टिक टी-20 लीग सुपर स्मॅशमध्ये फलंदाजी करताना कार्टरने 29 चेंडूत 70 धावा फटकावल्या.
न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टर (Leo Carter) याने रविवारी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आणि ही कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक टी-20 लीग सुपर स्मॅशमध्ये (Super Smash) फलंदाजी करताना कार्टरने 29 चेंडूत 70 धावा फटकावल्या. कॅन्टरबरीकडून खेळत असताना कार्टरने नॉर्दर्न नाईट्सचा फिरकीपटू अँटोन डेवसिचविरुद्ध सामन्याच्या 16 व्या षटकात सलग सहा षटकार ठोकले आणि टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. या यादीतील भारताचा युवराज सिंह (Yuvraj Singh) पहिला, रॉस व्हाइटली दुसर्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये अफगाणिस्तान हजरतुल्ला जाझाई यानेही एका षटकात सहा षटकार ठोकले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम फक्त युवराज सिंहच्या नावे आहे. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) विरुद्ध 6 षटकार ठोकले होते.
एकंदरीत हे काम करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. गॅरी सोबर्स, रवी शास्त्री आणि हर्शल गिब्स यांनीही अन्य स्वरूपात सहा चेंडूत सहा षटकार ठोकले आहेत. 25 वर्षीय कार्टरने डावखुरा फिरकीपटू अँटोन डेवसिचच्या षटकात सहा षटकार ठोकले आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पाहा हा व्हिडिओ:
मॅचबद्दल बोलायचे झाले तर, नॉर्दन नाईट्सने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 219 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, कॅन्टरबरीने कार्टरकडून 7 बळी देऊन 7 गडी राखून 6 चेंडू राखत सामना जिंकला. सामन्यात कार्टरने 29 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. कर्णधार कोल मॅकोन्चीनेही 25 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी केली. या विजयाने टेबलच्या तळाला असलेल्या कॅन्टरबरीला प्लेऑफ गाठण्याची संधी दिली.