DC vs SRH IPL 2025 10th Match Live Scorecard: हैदराबादने दिल्लीसमोर ठेवले 164 धावाचे लक्ष्य, अनिकेत वर्माची 74 धावांची स्फोटक खेळी; तर स्टार्कने घेतल्या 5 विकेट

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

DC vs SRH IPL 2025 10th Match Live Scorecard: हैदराबादने दिल्लीसमोर ठेवले 164 धावाचे लक्ष्य, अनिकेत वर्माची 74 धावांची स्फोटक खेळी; तर स्टार्कने घेतल्या 5 विकेट
DC vs SRH (Photo Credit - X)

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दहावा सामना रविवारी 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

अनिकेत वर्माची 74 धावांची शानदार खेळी

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 18.4 षटकात 10 गडी गमावून 163 धावा केल्या. हैदराबादकडून अनिकेत वर्माने 74 धावांची शानदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 32 तर ट्रॅव्हिस हेडने 22 धावांचे योगदान दिले.

मिचेल स्टार्कने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स 

दुसरीकडे, मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने व्यतिरिक्त कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या. तर मोहित शर्माला 1 विकेट मिळाली. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).