SRH vs KKR IPL 2025 67th Match Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार भिडत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे.

SRH vs KKR IPL 2025 67th Match Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार भिडत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
KKR vs SRH (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders, IPL 2025 68th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामात, चार संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामातील 68 वा सामना आज म्हणजेच 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड 

आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सने वरचढ कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 20 सामने जिंकले आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादने फक्त नऊ सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 80 धावांनी विजय मिळवला. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळले गेले. कोलकाता नाईट रायडर्सने तिन्ही सामने जिंकले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा विजय नोंदवला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद पुनरागमन करू इच्छिते.

किती वाजता सुरु होणार सामना?

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2025 चा 68 वा सामना रविवार, 25 मे रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील. (हे देखील वाचा: SRH vs KKR T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर)

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर SRH विरुद्ध KKR आयपीएल 2025 चा 67 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2025 05:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).