Most Slowest ODI Innings: वनडे क्रिकेटच्या इतिहासात या 5 फलंदाजांनी कासवाच्या गतीने काढल्या धावा, आघाडीवर भारतीय दिग्गजाचा ताबा

परंतु त्याच्या कारकीर्दीवरही एक डाग असा आहे जो पुसला जाणे कठीणच आहे. वनडे  इतिहासातील सर्वात स्लो डाव खेळण्याचा रेकॉर्ड गावस्कर यांच्या नावावर आहे. पाहा वनडे इतिहासात कासवाच्या गतीने धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंची यादी. 

सुनील गावस्कर (Photo Credit: Getty)

Slowest ODI Innings: भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) निर्विवादपणे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांचा वैयक्तिक कामगिरीच्या क्षेत्रात उद्भव ही स्वातंत्र्योत्तर भारतीय क्रिकेट इतिहासाची सुवर्ण उपलब्धी आहे. ‘लिटिल मास्टर’ (Little Master) म्हणून प्रसिद्ध गावस्कर कसोटी इतिहासातील दहा हजार धावा करणारे जगातील पहिले फलंदाज होते. परंतु त्याच्या कारकीर्दीवरही एक डाग असा आहे जो पुसला जाणे कठीणच आहे. पहिल्या 1975 वर्ल्ड कपच्या (World Cup) एका सामन्यात त्यांनी 174 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या होत्या, परंतु जर आपणास वाटत असेल की यापेक्षा कोणाकडेही वाईट रेकॉर्ड नाही तर एकदा नक्कीच विचार करा. आज आपण वनडे इतिहासात कासवाच्या गतीने धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (Cricketers Sexist Or Racist Remarks: वर्णद्वेषी-लैंगिक टिप्पणीमुळे संकटात सापडले हे 5  क्रिकेटपटू, या प्रसिद्ध भारतीय खेळाडूंचाही यादीत समावेश)

1. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)

गावस्कर यांनी 1975 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात अगदी कासवाच्या गतीने धावा केल्या. 174 चेंडूंचा सामना करत त्यांनी 20.68 च्या स्ट्राइक रेटने 36  धावा काढल्या. या दरम्यान त्यांनी केवळ एक चौकार खेचला. या सामन्यात भारताने 60 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून फक्त 132 धावसंख्या उभारली. हा सामना भारताने लाजिरवाण्याने 202 धावांनी गमावला होता.

2. जावेद मियांदाद (Javed Miandad)

पाकिस्तानचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू जावेद मियांदाद आकर्षक डाव खेळण्यासाठी ओळखले जायचे, पण या नकोशा यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. 1 जानेवारी 1989 रोजी मियांदाद यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 167 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या.

3. मोहसीन खान (Mohsin Khan)

1983 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा सलामी फलंदाज मोहसीन खानने वेस्ट इंडीजविरुद्ध 176 चेंडूत 70 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्यांचा स्ट्राइक रेट 39.77 होता. मोहसीनच्या या खेळीला एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरा सर्वात हळू डाव म्हणतात.

4. ब्रूस एडगर (Bruce Edgar)

1979 वर्ल्ड कपच्या भारताविरुद्ध सामन्यात ब्रूस एडगर वनडे क्रिकेट इतिहासातील चौथा डाव खेळला होता. या दरम्यान, एडगरने 167 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी खेळली होती. एडगरने सर्वात स्लो डाव खेळला असूनही न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या दरम्यान त्यांचा स्ट्राइक रेट 50.29 होता.

5. आमिर सोहेल (Aamer Sohail)

अमीर सोहेल हा पाकिस्तानचा सर्वात स्फोटक फलंदाज मानला जात होता. पण एकदिवसीय क्रिकेटमधील 5वा सर्वात स्लो डाव खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 1993 मध्ये सोहेलने वेस्ट इंडिजविरुद्ध 167 चेंडूत 87 धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 52.09 होता.