Sunil Gavaskar-Anushka Sharma Controversy: विराट कोहली-अनुष्का शर्माबाबतच्या वादग्रस्त विधानावर सुनील गावस्कर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

आणि आता या सगळ्या प्रकरणावर गावसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गावस्कर यांनी यासंदर्भात एका मुलाखतीत आपली बाजू स्पष्ट केली. गावस्कर म्हणाले मी अनुष्काला दोष दिलेला नाही.

विराट-अनुष्काबाबत सुनील गावस्कर यांची प्रतिक्रिया (Photo Credit: Wikimedia Commons)

आयपीएल (IPL) 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्या सामन्यादरम्यान सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) लाईव्ह भाष्यादरम्यान असे काहीतरी बोलले गेले ज्यानंतर वाद निर्माण झाला. बेंगलोर आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिग्गज क्रिकेटपटू आणि भाष्यकार गावसकर यांनी कमेंटरीदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माबाबत (Anushka Sharma) वक्तव्य केले, ज्यानंतर सोशल मीडियावर गावसकर यांना बॅन करण्याची मागणी सुरू झाली. या दरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गावसकर यांच्या टिप्पणीबाबत संताप व्यक्त केला. आणि आता या सगळ्या प्रकरणावर गावसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गावस्कर यांनी यासंदर्भात एका मुलाखतीत आपली बाजू स्पष्ट केली. गावस्कर म्हणाले मी अनुष्काला दोष दिलेला नाही. (Anushka Sharma to Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर भडकली अनुष्का शर्मा, म्हणाली 'माझे नाव वापरूनच तुमची प्रतिक्रिया पूर्ण होणार होती का?')

गावसकर यांनी केलेल्या टिपण्णीचा एका व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गावसकर, "विराट कोहलीला माहित आहे कसा सराव करावा. लॉकडाऊनमध्ये त्यानं अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला, याचा एक व्हिडिओ मी पाहिला. पण केवळ ते पुरेसे नाही". यावर गावस्कर यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटले की,“आकाश आणि मी हिंदी वाहिनीवर भाष्य करीत होतो. आणि आकाश हे बोलत होते की प्रत्येकाला योग्य सराव करण्याची संधी फारच कमी मिळाली. हे पहिल्या सामन्यांमधील काही खेळाडूंच्या खेळाने दर्शविले.” त्यांनी पुढे म्हटले, “विराटकडेदेखील कोणताही सराव नव्हता आणि फक्त असा सराव होता जेव्हा ते त्यांच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये खेळताना दिसले आणि अनुष्का त्याला गोलंदाजी करत होती. मी तेच तर बोललो. फक्त तेवढीच गोलंदाजी…त्याशिवाय एकही शब्द मी काढला नाही. मी तिला कोठे दोष देत आहे? यात मी कुठे सेक्सिस्ट आहे? व्हिडिओमध्ये काय दिसले ते मी फक्त सांगितले जे कदाचित शेजारच्या इमारतीत कोणीतरी रेकॉर्ड केले असेल आणि नंतर पोस्ट केले.मी हे एकमेव काम करत होतो.”

दरम्यान, कोहलीच्या फलंदाजीतील अपयशासाठी अनुष्काला दोष देण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्ये वर्ल्ड कपमधून जेव्हा भारत बाहेर पडला होता तेव्हा विराटच्या कामगिरीचा संबंध अनुष्काशी जोडला गेला होता. भारताकडून सेमीफायनल सामन्यात विराटने 1 धाव केली होती.