Hardik Pandya Replacement: टीम इंडियात अष्टपैलू हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी माजी भारतीय दिग्गज फलंदाजाने दिले ‘हे’ दोन पर्याय
श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामना खेळत हार्दिकने निराश केले आहे. अशास्थितीत गावस्कर यांनी अष्टपैलू भूमिकेसाठी भुवनेश्वर कुमार व दीपक चाहरचा पर्याय सुचवला आहे.
Hardik Pandya Replacement: माजी अनुभवी सलामीवीर आणि भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी वारंवार होणाऱ्या दुखापतीने त्रस्त हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) बॅकअप म्हणून दोन खेळाडू पर्याय म्हणून सुचवले आहेत. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) चारही सामन्यांमध्ये (3 एकदिवसीय आणि 1 टी-20) सामना खेळत हार्दिकने निराश केले आहे. हार्दिक हा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. विजय शंकर आणि शिवम दुबे यांचा काही वेळा संधी देण्यात अली असली तरी हार्दिकने यापूर्वी केलेले प्रभाव यापैकी कोणीही तयार करु शकले नाहीत. तथापि, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात शून्यावर बाद झालेल्या बडोद्याच्या क्रिकेटपटूसाठी फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. अशास्थितीत गावस्कर यांनी अष्टपैलू भूमिकेसाठी भुवनेश्वर कुमार व दीपक चाहरचा पर्याय सुचवला आहे. (Hardik Pandya's Replacement: हार्दिक पांड्याला झटका; धोनीच्या टीमचा हा स्टार बनणार टीम इंडियाचा पुढील अष्टपैलू, प्रशिक्षकाने केले समर्थन)
"अर्थातच, बॅक अप आहे. आपण अलीकडेच दीपक चाहरला पाहिले; त्याने सिद्ध केले की तो अष्टपैलू असू शकतो. भुवनेश्वर कुमार यांना तुम्ही संधी दिली नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी जेव्हा भारत श्रीलंकेत खेळला होता, तेव्हा त्याने धोनीबरोबरच एक सामना जिंकला होता. त्या सामन्यातील परिस्थिती दुसर्या वनडे सामन्यासारखीच होती. त्यांनी 7-8 विकेट्स गमावले होते आणि भुवनेश्वर आणि धोनीने तो सामना भारतासाठी जिंकला होता," गावस्कर स्पोर्ट्स तक वर म्हणाले. गावस्कर पुढे म्हणाले की, अष्टपैलू भूमिकेत आणखी काही संधी मिळवण्याच्या पात्रतेत असे काही खेळाडू आहेत पण त्यांना देण्यात आले नाही. भारतीय क्रिकेटपटूच्या मते अशा प्रकारच्या निर्णयामुळे आज भारताची परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडच्या काळात भारतीय स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तो आता बर्याचदा मैदानात फलंदाजी करताना दिसतो. मात्र, फलंदाजी करतानाही त्याची बॅट काही खास कामगिरी करत नाही.
श्रीलंकेविरुद्ध दुसर्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरने 82 चेंडूत नाबाद 69 धावांची कामगिरी करत संघासाठी पराभवाच्या तोंडून विजय खेचून आणला. भुवनेश्वरला दुखापतीमुळे त्रास झाला होता. परंतु तो खालच्या फळीत धावा करू शकणार एक फलंदाज बनू शकतो. दरम्यान, या दोघांना तसे करण्यास पर्याप्त संधी मिळते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.