भारतीय दिग्गजचे मोठे भाष्य, पुढील दोन T20 वर्ल्ड कपसाठी कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला लवकर द्या नेतृत्वाची धुरा; Pant-राहुललाही दिली जबाबदारी

आगामी दोन टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल याबाबत भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी खुलासा केला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक 2021 नंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. रोहित शर्माने पुढील टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारावे असे वाटते असे गावसकर यांना वाटते.

भारतीय दिग्गजचे मोठे भाष्य, पुढील दोन T20 वर्ल्ड कपसाठी कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला लवकर द्या नेतृत्वाची धुरा; Pant-राहुललाही दिली जबाबदारी
सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी खुलासा केला आहे की, आगामी दोन टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल. भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 विश्वचषक 2021 नंतर टी-20 चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या दरम्यान गावसकर यांना रोहित शर्माने (Rohit Sharma) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे  (Team India) कर्णधारपद स्वीकारावे असे वाटते. उपकर्णधारपदासाठी त्यांनी युवा केएल राहुल  (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांची निवड केली आहे. गावस्कर म्हणाले की संघ व्यवस्थापन राहुल आणि पंत यांना टी-20 फॉरमॅटमध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त करू शकतात. गावस्कर यांनी असेही सांगितले की, कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली असल्याने रोहित त्याच्या जागी सर्वोत्तम पर्याय आहे. टी-20 विश्वचषक यंदा संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे, तर टी-20 विश्वचषक पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाईल. (Virat Kohli नंतर टीम इंडियाचा T20 कर्णधार कोण बनणार? Rohit Sharma च नाही तर या खेळाडूंमध्येही आहे भरपूर दम)

गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेडमध्ये टीम इंडियाचा पुढील कर्णधार आणि उपकर्णधार बद्दल बोलले आणि म्हणाले, “माझ्या मते रोहित शर्माने पुढील दोन विश्वचषकांमध्ये कर्णधारपद भूषवावे. कारण दोघेही एकामागून एक आहेत. एक विश्वचषक पुढील महिन्यापासून आणि दुसरा विश्वचषक त्यानंतर एक वर्ष आहे. तर हो मला इतक्या कमी कालावधीत बरेच कर्णधार बदलणे आवडणार नाही. दोन्ही टी-20 वर्ल्ड कपमध्ये, रोहित शर्माला टीम इंडियाचे नेतृत्व केलेले मला आवडेल आणि नंतर मी केएल राहुलला उपकर्णधार म्हणून पाहतो.”

गावस्कर पुढे म्हणाले की , “मी पंतलाही लक्षात ठेवेन, त्याने दिल्ली कॅपिटल्सचे खूप चांगले नेतृत्व केले आहे. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या कर्णधारपदामुळे खूप प्रभावित केले आहे. त्याने कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे सारख्या गोलंदाजांचा खूप मनाने वापर केला आहे, हे दाखवते की तो एक स्ट्रीट स्मार्ट कर्णधार आहे. त्यामुळे मी राहुल आणि पंतला उपकर्णधार म्हणून पाहतो.”

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2021 06:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).