T20 World Cup 2022: सुनील गावस्कर टीम इंडियावर भडकले, सराव सत्राशी संबंधित या निर्णयावर प्रश्न केले उपस्थित
टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) आणि भारत-पाक (IND vs PAK) सारख्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी भारतीय खेळाडूंनी अशाप्रकारे सराव सत्रापासून दूर राहिल्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये, टीम इंडिया (Team India) 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या महान सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना टीम इंडियाच्या एका कृत्याचा राग आला आणि त्यांनी त्याबद्दल संघावर जोरदार टीका केली आहे. वास्तविक, पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) महान सामन्यापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामने खेळायचे होते. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात भारताला यश आले, मात्र न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला. सराव सामना गमावल्यानंतर, भारताने मेलबर्नमध्ये (MCG) एक पर्यायी सराव सत्र आयोजित केले ज्यामध्ये संघाच्या सर्व खेळाडूंनी भाग घ्यायचे की नाही खेळाडूनवर अवलंबून होते. यावर त्यांनी भारतीय संघाला सुनावले.
सराव सत्रात सहभागी होण्याचा पर्याय खेळाडूंना नसावा
विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, केएल राहुल आणि इतर काही खेळाडूंनी शुक्रवारी ऐच्छिक सराव सत्रात भाग घेतला नाही. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि दीपक हुडा नेटवर घाम गाळताना दिसले. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी सराव सत्रात सहभागी होण्याचा पर्याय खेळाडूंना नसावा, असे सुनिल गावस्कर यांचे म्हणणे आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK: सामन्यापूर्वी रोहित म्हणाला - नऊ वर्षांपासून ICC स्पर्धेतील मोठे सामने न जिंकल्याबद्दल पश्चात्ताप, यावेळी आम्ही तयार आहोत)
सराव न करण्याचा निर्णय चुकीचा
इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले, 'मला माहित नाही की हे तुम्हाला काय सांगत आहे पण ही गोष्ट मला मान्य नाही. मी याच्याशी सहमत नाही, कारण स्पर्धेच्या सुरुवातीला, जेव्हा तुमचा सामना (सराव सामना) वाहून गेला होता, जेव्हा तुम्ही मेलबर्नला आलात आणि एक दिवस सुट्टी घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सराव न करण्याचा निर्णय घेतला होता. ?' हे चुकीचे आहे.
एक संघ म्हणून तुम्हा सर्वांना एक लय असली पाहिजे
ज्या खेळाडूंनी सरावात भाग घेतला नाही ते कदाचित सामना विजेता म्हणून परत येतील पण मी म्हणेन की एक संघ म्हणून तुम्हा सर्वांना एक लय असली पाहिजे. संघात उद्देशाची भावना असली पाहिजे. जर तुम्ही शेवटच्या सामन्यात शतक केले असेल किंवा एखाद्या गोलंदाजाने 20-30 षटके टाकली असतील, जर थोडा थकवा आला असेल तर कर्णधार आणि प्रशिक्षक त्या खेळाडूला सराव सत्रात भाग घेण्यापासून सूट देऊ शकतात परंतु पर्याय देणे योग्य नाही.