Steve Smith On Ravichandran Ashwin: अश्विनविरुद्ध आमचा संघ तयारीनिशी उतरणार मैदानात, सामन्यापूर्वी स्टीव्ह स्मिथने केला मोठा दावा
टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनविरुद्ध (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलिया खास तयारीने मैदानात उतरत आहे.
IND vs AUS 1st Test: उद्यापासून म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धा (Border-Gavaskar Trophy) रंगणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूरची खेळपट्टी रँक टर्नर असल्याचे म्हटले जाते, ज्यावर फिरकीपटू मारक ठरू शकतात. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनविरुद्ध (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलिया खास तयारीने मैदानात उतरत आहे. नागपूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) अश्विनबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: आर अश्विन कसोटीतील 'हा' अनोखा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ, अनिल कुंबळेला मागे टाकून रचणार इतिहास)
खरे तर पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला विचारण्यात आले की ऑस्ट्रेलियन संघ अश्विनबद्दल अतिविचार करत आहे का? यावर स्मिथने उत्तर दिले की, 'आम्ही अनेक फिरकीपटूंविरुद्ध सराव केला आहे. महेश त्यापैकीच एक. तो अश्विनच्या शैलीत गोलंदाजी करतो. आम्ही गोष्टींचा अतिविचार करत नाही. अर्थात अश्विन हा उत्तम गोलंदाज आहे, पण त्याचा मुकाबला करण्याची आमची योजना आहे.
अश्विनविरुद्ध कांगारू पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार
नागपूर कसोटीपूर्वी रविचंद्रन अश्विनसारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिठियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ गेल्या 1 आठवड्यापासून सराव करत आहे. सरावानंतर स्टीव्ह स्मिथने अश्विनविरुद्ध प्लॅन असल्याचे सांगितले आहे. म्हणजे अश्विनविरुद्ध कांगारू पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट , सूर्यकुमार यादव.