2021 टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याबाबत PCB चा घुमजाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान फेटाळलून लावले वृत्त
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वसीम खान यांनीआशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसेल, तर बोर्ड 2021 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ भारतात पाठवणार नाही.मात्र, खान यांनी आता या स्पर्धेतवर बहिष्कार घालण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. खान यांनी स्पष्टी केले की ते असे कधीच बोलले नाही.
पीसीबीचे (PCB) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वसीम खान (Wasim Khan) यांनी शनिवारी सांगितले की, यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup) टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघ (Indian Team) पाकिस्तानचा (Pakistan) दौरा करणार नसेल, तर बोर्ड 2021 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ भारतात पाठवणार नाही. खान यांनी लाहोरमध्ये पत्रकारांना सांगितले, "भारतीय संघ जर आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर आम्ही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात (World Cup) सहभागी होण्यास नकार देऊ." मात्र, खान यांनी आता या स्पर्धेतवर बहिष्कार घालण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. खान यांनी स्पष्टी केले की या वर्षाच्या अखेरीस आशिया चषक स्पर्धेत बीसीसीआयने (BCCI) आपल्या संघाला पाकिस्तान दौरा करण्यास परवानगी न दिल्यास पाकिस्तान 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात पाठवणार नसल्याचे त्याने कधीही म्हटले नाही. (Asia Cup 2020: भारताच्या आक्षेपानंतर पाकिस्तान नाही करणार आशिया चषक स्पर्धेचे आयोजन? वाचा सविस्तर)
“हे पूर्णपणे संदर्भ बाहेर काढले गेले आहे. आम्हाला अद्याप पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा घ्यायची इच्छा असली तरी आशियाई क्रिकेट कौन्सिलने भारताशी संबंधित सामन्यांविषयी काय करायचे याचा निर्णय घेण्याची गरज आहे,” असे खान यांनी शनिवारी लाहोरमधील स्पोर्ट्सटरला सांगितले. यापूर्वी, भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा न केल्यास पीसीबी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकवर बहिष्कार घालेल असे वृत्त सामोर आले होते. “हे अगदी चुकीचे आहे. मी काय सांगू इच्छितो की आम्हाला सुरक्षिततेच्या मुद्द्यांविषयी चिंता आहे आणि व्हिसा मिळविण्याबाबतही चिंता आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की काही कालावधीत सर्व गोष्टी सहज होतील, ”खान पुढे म्हणाले. टी -20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2018 मध्ये भारताने युएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते, जे तटस्थ होते आणि सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये जाण्यास सरकारकडून मंजुरी मिळणार नाही, असे अहवालांनी म्हटले आहे. 2008 पासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही, तर राजकीय आणि मुत्सद्दी संबंधांमुळे 2007 पासून त्यांनी पाकिस्तानबरोबर संपूर्ण द्विपक्षीय मालिका खेळली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता.